team india saam tv
क्रीडा

IND vs WI: रोहितमुळे 'या' स्टार फलंदाजाची कारकीर्द संपली! वेस्ट इंडिजविरुद्ध आहे दमदार रेकॉर्ड

Hanuma Vihari: भारतीय संघात एक असा खेळाडू देखील आहे ज्याने ९६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

Ankush Dhavre

India Tour Of West Indies: भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. १२ जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

कसोटी मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. तर काही अनुभवी खेळाडूंना दुर्लक्ष केलं आहे. या खेळाडूंमध्ये एक असा खेळाडू देखील आहे ज्याने ९६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

९६ च्या सरासरीने धावा करणारा फलंदाज संघाबाहेर..

भारतीय संघाने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने २-० ने मालिका खिशात घातली होती. त्यावेळी हनुमा विहारी हा भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला होता.

त्याने २ सामन्यांमध्ये ९६.३३ च्या सरासरीने २८९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि २ अर्धशतके झळकावली होती. मात्र यावेळी तो संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.

१ वर्षापासून संघाबाहेर..

हनुमा विहारी हा गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून आला होता. या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात २० तर दुसऱ्या डावात ११ धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर तो भारतीय संघात कमबॅक करू शकला नाही. त्याने भारतीय संघासाठी १६ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने ३३.५६ च्या सरासरीने ८३९ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरु..

भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी हनुमा विहारी जोर लावताना दिसून येत आहे. तो दिलीप ट्रॉफी स्पर्धेत साऊथ झोन संघाचे नेतृत्व करतोय. तसेच त्याने एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत तो आतापर्यंत आंध्रप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करायचा. मात्र यावेळी तो मध्यप्रदेश संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

फिल्मी स्टाईल Honeymoon Destination शोधताय? रणबीरच्या सुपरहिट चित्रपटाचं 'हे' लोकेशन बेस्ट

SCROLL FOR NEXT