Asia Cup 2023 Schedule: कुठे, केव्हा आणि कधी रंगणार आशिया चषक स्पर्धेतील सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

Asia Cup 2023 Time Table: आशिया चषक २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
asia cup
asia cup saam tv
Published On

Asia Cup 2023 Updates: आशिया चषक २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते.

यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

asia cup
ODI WC 2023: पाकिस्तानला भारतात यावच लागेल! नकार देणाऱ्या PCB ची ICC ने मोजक्या शब्दात चांगलीच जिरवली

कुठे रंगणार सामने?

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सामने पाकिस्तानच्या लाहोर आणि श्रीलंकेच्या दंबुला येथे खेळवले जाऊ शकतात. तर प्लान बी म्हणून कोलंबोचा समावेश केला जाऊ शकतो. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, याच आठवड्यात आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते.

भारत - पाकिस्तान सामन्याचे आयोजन कोलंबोच्या मैदानावर केले जाणार होते. मात्र पावसामुळे या सामन्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा सामना दांबुलाच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो. (Latest sports updates)

asia cup
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

असं असू शकतं आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक..

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहे. हे सामने पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, स्पर्धेतील पहिला सामना ३१ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना श्रीलंकेत रंगणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना श्रीलंका संघाविरुद्ध खेळवला जाऊ शकतो. हे दोन्ही संघ ६ सप्टेंबर रोजी आमने सामने येऊ शकतात.

वर्ल्डकप स्पर्धेत रंगणार भारत - पाकिस्तान सामना..

काही दिवसांपूर्वी आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारत- पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com