Washington Sundar Catch Controversy x
Sports

Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर आउट होता का? अंपायर्सच्या निर्णयावर भडकले क्रिकेटप्रेमी, मैदानात नेमकं काय घडलं होतं?

Washington Sundar Catch Controversy : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना गुजरातने ७ विकेट्सनी जिंकला. पण सोशल मीडियावर गुजरातच्या विजयापेक्षाही वॉशिंग्टन सुंदरच्या कॅचची अधिक चर्चा पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

Washington Sundar Controversy : घरच्या स्टेडियमवर काल सनरायजर्स हैदराबादचा पराभव झाला. गुजरात टायटन्सने हैदराबादवर मात करत दोन गुण मिळवले. आयपीएल २०२५ मध्ये हैदराबादने पहिला सामना जिंकला. पण त्यानंतर त्यांना सलग चार सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या बाजूला गुजरातने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरातच्या सामन्यामध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना एकूण १५२ धावा केल्या. विजय गाठताना गुजरातचा संघ मैदानात उतरला. गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन लवकर बाद झाला. तिसऱ्या क्रमावर आलेला जॉस बटलरची शून्यावर विकेट पडली. शुबमन गिलने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने खेळ पुढे नेला. वॉशिंग्टन सुंदरने काल अप्रतिम कामगिरी केली. पण त्याचे अर्धशतक फक्त एका धावने हुकले.

१४ व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद शमी आला. वॉशिंग्टन सुंदरने त्याने टाकलेला बॉल स्वीपर कव्हरकडे मारला. अनिकेत वर्माने त्याचा कॅच पकडला. पण बॉलचा जमिनीला स्पर्श झाला असे वाटत होते. तेव्हा कॅचची खात्री करण्यासाठी अंपायर्स थर्ड अंपायरकडे गेले. रिप्लेमध्ये बॉल जमिनीला स्पर्श करत असावा असे दिसून आले. पण तरीही सुंदरला बाद घोषित केले गेले.

वॉशिंग्टन सुंदर चौथ्या क्रमावर येऊन तुफानी फटके मारत होता. त्याच्या खेळीमुळे गिलचा देखील आत्मविश्वास वाढला होता. पण अर्धशतक पूर्ण व्हायला १ धाव पूर्ण असताना त्याला बाद घोषित करण्यात आले. यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सुंदर आउट नव्हता, तरी त्याला आउट घोषित केले असे अनेकजण म्हणत आहेत. त्याचे अर्धशतक अंपायर्सच्या निर्णयामुळे हुकल्याची प्रतिक्रिया बऱ्याचजणांनी दिली आहे.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग 11 :

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंदुने मेंडिस, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 :

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : वर्धेच्या सावंगी येथे विदर्भाचा राजा विराजमान

Rohit Sharma ODI Retirement: रोहित शर्माला वनडे क्रिकेटमधून रिटायर करण्याचा प्लान; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

Shocking : ५ वर्षाच्या चिमुकलीवर आईस्क्रीमवाल्याची वाईट नजर, आमिष दाखवलं अन्...

प्रेमविवाह, ३६ पानांची सुसाईड नोट... व्यावसायिकानं पत्नी अन् लेकीसह आयुष्य संपवलं, नेमकं कारण काय?

Sanjay Dutt : गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर संजय दत्तने खरेदी केली लग्जरी कार; किंमत वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT