GT VS RR Highlights News : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या संघाने २० ओव्हर्समध्ये एकूण २१७ धावा केल्या. यात साई सुदर्शनने सर्वाधिक ८२ धावा केल्या. त्याला बटलर, शाहरुख खानची साथ लाभली. आता राजस्थानच्या संघासमोर २१८ धावांचे आव्हान आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी गुजरात टायटन्सचे सलामीवीर मैदानात उतरले. घरच्या मैदानात गुजरात टायटन्सने २१७ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या ओव्हरमध्ये शुबमन गिल २ धावांवर बाद झाला. जोस बटलरच्या साथीने साई सुदर्शनने खेळ पुढे नेला. त्यानंतर ३६ धावा करुन बटलर तंबूत परतला. बटलरच्या जागी आलेल्या शाहरुख खान पुन्हा मोर्चा सांभाळला. ३६ धावांवर शाहरुखची विकेट पडली. लगेच ७ धावा करुन शेरफेन रुदरफोर्ड आला तसाच परत गेला. साई ८२ धावांवर आउट झाला. दुसऱ्या बाजूला तुषार देशपांडे आणि महेशा तीक्षणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. पण त्या दोघांनीही ५० पेक्षा जास्त धावा दिल्या.
गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 -
साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शेरफेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, राशिद खान, अरशद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11 -
यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, फजलहक फारूकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.