Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Dowry Case : हुंडा न मिळाल्याने विवाहितेला जबरदस्तीने अ‍ॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्यांवर कारवाई केली आहे.
Dowry case
Dowry casex
Published On
Summary
  • हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहितेला जबरदस्ती अ‍ॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना अमरोहा येथे घडली.

  • गंभीर अवस्थेत उपचार घेत असलेल्या पीडित महिलेचा १७ दिवसांनी मृत्यू झाला.

  • पोलिसांनी पतीसह सासरच्यांवर हुंडा, छळ आणि खून यांसह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

Shocking : हुंड्यापायी आणखी एका विवाहितेचा बळी गेल्याचे समोर आले आहे. हुंड्यांची मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला अ‍ॅसिड पाजण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अघोरी प्रकारामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकबारा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी फुररान यांची मुलगी गुल फिजाचा विवाह एका वर्षापूर्वी अमरोहाच्या दिदौली कोतवालीमधील काला खेडा गावात राहणाऱ्या परवेजशी झाला होता. लग्न ठरल्यापासून परवेज, त्याचे कुटुंबीय हुंड्याची मागणी करत होते. विवाहानंतर हुंड्यासाठी गुल फिजाचा छळ सुरु होता.

Dowry case
Shocking : नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात दिला बाळाला जन्म, सरकारी निवासी शाळेत भयंकर घडलं

११ ऑगस्ट रोजी सासरच्यांनी मिळून गुल फिजाला जबरदस्तीने अ‍ॅसिड प्यायला लावले असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. यानंतर गुल फिजाची तब्येत बिघडली. तिला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते. १७ दिवसांच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Dowry case
Car Crash : मराठा आंदोलकांच्या कारचा भीषण अपघात; तिघेजण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

पीडित विवाहितेच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पीडितेचा पती, सासू, सासरे आणि सासरच्या अन्य लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेच्या मृत्यूनंतर हत्येचे गुन्हेही जोडण्यात आले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Dowry case
Crime : गर्लफ्रेंडचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला, रागाच्या भरात बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com