
वाशीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या कारला अपघात झाला, तिघेजण जखमी झाले.
या अपघातात एक जखमीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मोर्चादरम्यान मुंबईकडे जात असताना ही दुर्घटना घडली असून कार्यकर्ते लातूरचे आहेत.
संदीप भोसले, साम टीव्ही, प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई मोर्चाची हाक दिली आहे. त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. या प्रवासादरम्यान मोर्चातील एका व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले. या घटनेनंतर आता वाशीमध्ये मराठा कार्यकर्त्यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या कार दुर्घटनेमध्ये तिघेजण जखमी झाले असून एकजण गंभीर आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी सकल मराठा समाजासह पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. काल २७ ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात मोर्चासाठी एकत्र येण्याचे आवाहन मराठा समाजाला जरांगे पाटील यांनी केले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईलगतच्या वाशी टोलनाक्यावर मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला. वाशी टोल नाक्यावर मराठा समाजाच्या नेत्यांनी जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. 'आता मुंबईत जायचं, या सरकारच काय करायचं', अशा प्रकारच्या घोषणा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वाशी टोलनाक्यावर सुरु असलेल्या घोषणाबाजीदरम्यान मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. हे कार्यकर्ते लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मराठा कार्यकर्ते असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.