MHADA Lottery : आनंदाची बातमी! ५,२८५ घरांबाबत म्हाडाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Mhada News : म्हाडाने जाहीर केलेल्या ५,२८५ घरे आणि ७७ भूखंड विक्री सोडतीसाठीच्या अर्जासंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हाडाने अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे.
mhada
mhadax
Published On
Summary
  • म्हाडाने ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्री सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.

  • अर्ज सादर करून RTGS/NEFT द्वारे भरणा १५ सप्टेंबरपर्यंत करता येईल.

  • सोडतीचा निकाल ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील कार्यक्रमात जाहीर केला जाणार आहे.

Mhada News : स्वत:चे हक्काचे घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण वे क्षेत्रविकास मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका आणि भूखंड विक्री सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने जाहीर केलेल्या ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्री सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून १२ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे. सोडतीचा संगणकीय कार्यक्रम ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडणार आहे. २८ ऑगस्टपर्यंत एकूण १,४९,९४८ अर्ज नोंदणी झाले असून त्यापैकी १,१६,५८३ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.

mhada
Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

नवीन वेळापत्रकानुसार :

१२ सप्टेंबर रात्री ११:५९ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत RTGS/NEFT द्वारे भरणा करता येणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी प्रारूप यादी जाहीर केली जाईल. २४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. पुढे ७ ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ ऑक्टोबरला सोडतीचा निकाल जाहीर होईल.

mhada
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

या सोडतीत सर्वसमावेशक योजना, एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना, परवडणाऱ्या घरांची योजना तसेच भूखंड विक्री या पाच घटकांमध्ये घरे उपलब्ध होणार आहेत. सदनिका-भूखंड विक्री सोडतीसाठीचा अर्ज सादर करमण्याची मुदत वाढवल्याने इच्छुकांना अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे.

mhada
Weather Update : सप्टेंबरमध्ये पाऊस कोसळणार? हवामान खात्याचा धडकी भरवणारा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com