Maharashtra Live News Update: लातूर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, घरणी नदीला पूर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२५, गणेशोत्सव, दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, मनोज जरांगेंचा मोर्चा, जरांगेंचा मोर्चा जुन्नरवरून मुंबईकडे निघणार, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Latur: लातूर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, घरणी नदीला पूर

लातूर -

लातूर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस

घरणी नदीला पूर आल्याने, शिरूर अनंतपाळ ते धामणगाव जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी

अनेक गावांचा संपर्क तुटला.

Junnar: मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात जाहीर सभा घेणार

जुन्नर -

मनोज जरांगे पाटील जाहीर सभा घेतील

जुन्नरमधील मराठा समाज बांधव उपस्थित

जुन्नरमधून जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

Pune: पुण्यात वाहनांसाठी लागणाऱ्या साहित्याला आग

पुणे-

पुण्यात वाहनांसाठी लागणाऱ्या साहित्याला आग

पत्र्याच्या शेड मध्ये ठेवण्यात आलेल्या साहित्याला आग

पुण्यातील खराडी रस्त्यावर महालक्ष्मी लॉन्स समोर एका पत्र्याचे शेडमध्ये आग

पहाटे पाच वाजता या शेडमध्ये असणारे चारचाकी वाहनांसाठी लागणारे साहित्य तसेच यंत्रसामुग्री, प्लास्टिक, कागद, पुठ्ठे या सामानास आग लागली

अग्निशमन दलाच्या तीन वाहंनासह जवानांनी आग आटोक्यात आणत धोका टाळला

घटनेत जखमी कोणी नाही मात्र आग कशी लागली हे समजू शकलेले नाही

Ratnagiri: 'आम्ही ओरीजनल' अशा आशयाचे मंत्री नितेश राणे यांचे रत्नागिरीत बॅनर्स

रत्नागिरी - आम्ही ओरीजनल अशा आशयाचे मंत्री नितेश राणे यांचे रत्नागिरीत बॅनर्स

शहरातल्या मुख्य ठिकाणी अशा आशयाचे बँनर्स

भगव्या रंगात ओरिजनल हा शब्द, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघात हे बॅनर्स

गेल्या आठवड्यात भगव्या शालीवरून उदय सामंत आणि नितेश राणे यांच्याच शाब्दीत चकमक

मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या आहेत, काही लोक या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात असं सामंत यांचे विधान

त्यावर आम्ही ओरीजनल असा नितेश राणे यांनी वापरला होता शब्द प्रयोग

त्यानंतर रत्नागिरीत या शब्दाचा आधार घेत लागले नितेश राणे यांचे गणपतीच्या शुभेच्छा देणारे बॅनस्र

Jalna: जालन्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना

जालना -

जालन्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करणार आहेत

त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहे

Latur: रेणा मध्यम प्रकल्पाचे २ दरवाजे उघडले, रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

लातूर -

रेणा मध्यम प्रकल्पाचे २ दरवाजे उघडले, रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

लातूरच्या रेणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढती आहे

तर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा लक्षात घेऊन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू

पुढील काही तास लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला

Pimpari: दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी-चिंचवड -

मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

18 मोटरसायकल आणि 2 आटो रिक्षा पोलिसांनी केले जप्त

Nashik: देशासह परदेशात अतिरिक्त कांदा उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा वांदा

नाशिक -

- देशासह परदेशात अतिरिक्त कांदा उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा वांदा

-मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याला दर नाही

- भारतासह स्पर्धक देश बांगलादेश श्रीलंका, हॉलंड, पाकिस्तानमध्ये कांद्याचे अतिरिक्त उत्पादन

- कांद्याला मागणी कमी झाल्याने राज्यातील कांदा शेतकऱ्यांना फटका

- आगामी काळात दक्षिण भारतात कांद्याला मागणी न वाढल्यास भाव आणखी कोसळण्याची शक्यता

Amravati: अमरावती जिल्ह्यात सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी

अमरावती -

अमरावती जिल्ह्यात सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी

नोंदणीसाठी प्रथमच "कपास किसान" अँपचा वापर, 30 सप्टेंबर पर्यंत करता येणार शेतकऱ्यांना नोंदणी

शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात दहा केंद्रांची सुरुवात

मागील वर्षी पेक्षा कापसाला सीसीआय मध्ये 589 रुपये ज्यादा दर

Nagpur: नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

नागपूर -

- नागपूर जिल्ह्या परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

- कॉंग्रेसचे उमेदवारही आपापल्या सर्कलमध्ये सज्ज

- गेली 2 टर्म सत्तेने हुलकावणी दिल्याने यंदा भाजप जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारीला लागली आहे...

- भाजपने 57 सर्कल मध्ये उमेदवारीसाठी सर्व्हे केल्याची चर्चा आहे..

- सर्वेच्या आधारे मेरिटवर असलेल्या उमेदवारांना मिळणार तिकीट मिळणार असल्याचं बोललं जातं आहे..

- सर्व्हेमुळे इच्छुकांची धाकधूक वाढली, तेव्ह आरक्षण काही सर्कलमध्ये काय असणार याकडेही लक्ष ठेवून आहे...

Amravati: दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये उभारले जाणार स्वयंचलित हवामान केंद्र

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये उभारले जाणार स्वयंचलित हवामान केंद्र

हवामान केंद्रामुळे नैसर्गिक आपत्ती झालेल नुकसान व हवामान विषयक अचूक माहिती मिळणार

केंद्र सरकारच्या विडस या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार

आपत्ती, भूकंप ,पूर गारपीट, ढगफुटी याची पूर्व माहिती मिळणार.

Nagpur: नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याची 23 लाखांनी फसवणूक

नागपूर -

- नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांनी फसवणूक

- पेठे यांच्या खात्यातील परस्पर शेअर अन्य खात्यात वळते करून केली फसवणूक

- याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी नंदन ओमप्रकाश गोस्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय

- ठकबाजाचे मध्यप्रदेशच्या थार जिल्ह्यातील सरदारपूर येथील रहिवासी आहे

Pune: मनोज जरांगे पाटील जुन्नर शहरात दाखल, आज मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार

मनोज जरांगे पाटील जुन्नर शहरात दाखल झालेत

जुन्नरमधील वनविभागाच्या गेस्ट हाऊसला पोहोचले

काही वेळ गेस्ट हाऊसला विश्रांती घेणार

त्यानंतर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन माती कपाळी लावणार

मराठा आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प करणार आहेत.

यानंतर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com