सर्वसामान्य खासगी क्षेत्रातील नोकरदार आधीच योग्य वेतन वाढ आणि कामाच्या तासांमुळे त्रस्त असताना कॅबिनेट बैठकीत खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी 10 तासांच्या ड्युटीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची चर्चा आहे
खासगी क्षेत्रात आता 10 तास काम ? HEADER
8 तासाऐवजी 10 तास काम करण्याचा प्रस्ताव सादर
ओव्हरटाईमची मर्यादा तीन महिन्यात 125 वरून 144 तास
परिस्थितीनुसार 12 तासापेक्षाही अधिक काम करावं लागणार
दरम्यान जितेंद्र आव्हाडांनीही X वर पोस्ट करत सरकारवर टीका केलीय.. "हा प्रस्ताव कायद्यात आला तर कामगार गुलामगिरीच्या युगात ढकलले जातील, अशी टीका आव्हाडांनी केलीय. " याआधीही नारायण मूर्ती आणि L & T चे चेअरमन S. N. सुब्रम्णयम यांनी कामाच्या तासांची मर्यादा वाढवून आठवड्याला 70 ते 90 तास करा असा सल्ला दिला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसात असा प्रस्ताव आल्यानं सर्वसामान्य चिंताग्रस्त झालेत. कारण लोकलमधील लोंबकळून होणारा प्रवास, धक्के खात बसचा प्रवास, टॅक्सी रिक्षावाल्यांकडून होणारी पिळवणूक सहन करत सर्व सामान्य नागरिक काम करतो. पण सल्ले देणारे आणि कायदे बनवणाऱ्यांच्या वाट्याला हे भोग कुठेत त्यामुळे ८ तासांवरुन 10 तास कामाचा निर्णय घेतांना एकदा नव्हे तर 100 वेळा विचार करणं गरजेचं आहे.
याआधीही नारायण मूर्ती आणि L & T चे चेअरमन S. N. सुब्रम्णयम यांनी कामाच्या तासांची मर्यादा वाढवून आठवड्याला 70 ते 90 तास करण्यासंदर्भात विधानं केली होती. त्यानंतर मूर्ती आणि सुब्रम्णयम यांच्यावर अनेकांनी समाजमाध्यमांवर टीका केली होती. तसचं कामावर होणाऱ्या पिळवणुकीचा आपला अनुभव समाजमाध्यमांवर व्यक्त केला होता. मुंबईसारख्या महानगरात कामासाठी येणाऱ्य़ा अनेकांना रोज दीड ते 2 तासांचा प्रवास करावा लागतो. त्यात कामाच्या तासांची मर्यादा 10 तास केल्यावर वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलेन्स करणं , कठीण होऊन जाईल आणि त्यामुळे उद्धभवणारे प्रश्न हे अधिक जटील असतील...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.