Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Truck Rickshaw Accident In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका ऑटोरिक्षाला धडक दिली, ज्यामध्ये सहाजण जागीच ठार झाले आणि तीन जण जखमी झाले. कापंगवजवळ हा अपघात झाला.
Truck Rickshaw Accident In Chandrapur
Horrific accident in Chandrapur’s Rajura: Six killed as truck crashes into rickshaw near Kapangav.saamtv
Published On
Summary
  • चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात ट्रक-रिक्षाचा अपघात झाला आहे.

  • भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या कापणगाव येथे ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकने रिक्षाला जोरदार धकड दिल्यानं हा अपघात घडला असून यात ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक राजुऱ्याकडून खामोना-पाचगाव इकडे जात होता, तर रिक्षा विरुद्ध दिशेने गडचांदूर येथून राजुऱ्याकडे येत होती. त्याचवेळी हा अपघात झाला.

Truck Rickshaw Accident In Chandrapur
Car Crash : मराठा आंदोलकांच्या कारचा भीषण अपघात; तिघेजण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

प्रकाश मेश्राम (ऑटो चालक, वय ४८/पाचगाव), रवींद्र बोबडे (४८/पाचगाव), शंकर पिपरे (५०/कोची), तनु पिंपळकर (१६ /पाचगाव), ताराबाई पप्पूलवार (५०/पाचगाव) आणि वर्षा मांदाडे (५०/खामोना) अशी मृतांची नावे आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या तीन जणांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच एकजण किरकोळ जखमी झाल्यानं त्याला राजुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Truck Rickshaw Accident In Chandrapur
Kolhapur Ganeshotsav: पोलीस ॲक्शन मोडवर! गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, कोल्हापुरातील ३२ गणेश मंडळांवर कारवाई

ट्रक राजुऱ्याकडून खामोना-पाचगावकडे जात होता, तर रिक्षा गडचांदूर येथून राजुऱ्याकडे येत होती. त्यावेळी कापणगाव येथे सर्विस रोडवरून हायवेवर येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. यात रिक्षा चालक प्रकाश मेश्राम याच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय.

बुलढाण्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक

बुलढाण्यातील शेगाव - सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकिंची समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय. या अपघातात दोन जण ठार झालेत. तर चार जण जखमी झालेत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शेगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com