Kolhapur Ganeshotsav: पोलीस ॲक्शन मोडवर! गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, कोल्हापुरातील ३२ गणेश मंडळांवर कारवाई

Police Action On DJ Owners: कोल्हापूर जिल्हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यास आघाडीवर असतो. कोल्हापूरन महापालिकेनं गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केलीय. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरात ठिकठिकाणी १९० कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आली आहेत.
Police Action On DJ Owners
Police action against Ganesh mandals in Kolhapur for using loud DJ sound during festival processions.saam tv
Published On
Summary
  • कोल्हापुरातील ३२ गणेश मंडळांवर डीजे वापरल्यामुळे पोलिस कारवाई करण्यात आलीय.

  • डीजेचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालं आहे.

  • राजारामपुरीतील पोलिसांनी ही कारवाई केलीय.

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

कोल्हापूर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आघाडीवर असते. मात्र येथील काही काही गणेश मंडळांवर होणाऱ्या डिजेचा दणदणाट पोलिसांनी बंद पाडलाय. गणेशोत्सवात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. डीजेचा आवाज वाढवणाऱ्या कोल्हापुरातील ३२ गणेश मंडळांवर पोलिसांनी धडक कारवाई केलीय.

Police Action On DJ Owners
Shaktipeeth Highway Project : शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी बातमी! जीआर काढला, भूसंपादन आदेशातून कोल्हापूरला वगळलं

राजारामपुरीत झालेल्या गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी डिजेचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन केल्याचं आलं समोर आल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केलीय. डिजेचा आवाज वाढवणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षांबरोबरच ३२ डॉल्बी मालकांवर ही कारवाई करण्यात आलीय.

Police Action On DJ Owners
गणेश मिरवणुकीत भयंकर घडलं! नाचण्यावरून वाद, भररस्त्यात चाकूनं तरूणावर सपासप वार, कोल्हापूर हादरलं

२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान लेसर बंदी

लेसरमुळे डोळ्यासह मोबाईलही खराब झाल्याचे मागील दोन वर्षाच्या मिरवणुकीतून समोर आले होते. ४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीमध्ये लेसरवर बंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. कोल्हापूरचा गणेशोत्सव हा नेहमीच दिशादर्शक ठरतो, यंदाही मंडळांनी लेसरचा वापर टाळून आदर्श निर्माण करावा असे आवाहन पोलिसांनी केले होते.

गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या काळामध्ये ५ दिवस रात्री 12 वाजेपर्यंत साऊंडला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये 27 ऑगस्टला गणेश आगमनाचा दिवस आणि गणेशोत्सवातील इतर सहा दिवस (२ सप्टेंबर), आठवा (४ सप्टेंबर), नववा दिवस (५ सप्टेंबर) आणि शेवटचा म्हणजेच गणेश विसर्जनाचा (६ सप्टेंबर) या पाच दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत साऊंडला परवानगी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com