GT vs PBKS Gujarat titans captain shubman gill gets angry after defeat against punjab kings reveals the reason behind defeat  twitter
Sports

Shubman Gill Statement: हातचा सामना निसटल्यानंतर शुभमन गिल भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

GT vs PBKS, IPL 2024: या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. मात्र शेवटी गुजरातला हा सामना गमवावा लागला आहे.दरम्यान गिलने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill Statement News, GT vs PBKS IPL 2024:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने शानदार फलंदाजी केली. कर्णधार शुभमन गिलच्या शानदार ८९ धावांच्या खेळीच्या बळावर १९९ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातने फलंदाजी तर चांगली केली, मात्र क्षेत्ररक्षणात अफाट चुका केल्या. एकवेळ असं वाटलं होतं की, होमग्राऊंडवर गुजरातचा संघ हा सामना एकतर्फी जिंकणार, मात्र शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने गुजरातकडून विजय हिसकावून घेतला. दरम्यान या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

या पराभवानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, ' मला वाटतं की, आम्ही खूप झेल सोडले. झेल सोडल्यानंतर सामना जिंकणं कठीण होऊन जातं. गोलंदाजांनी खरंच चांगली कामगिरी केली. जेव्हा चेंडू बॅटवर येत असतो त्यावेळी धावांचा बचाव करणं कठीण होऊन जातं. आमच्याकडे बचाव करण्यासाठी कमी धावा होत्या, असं मी मुळीच म्हणणार नाही. २०० धावा आव्हानात्मक होत्या. आम्ही १५ व्या षटकापर्यंत सामन्यात टीकून होतो. झेल सोडल्यामुळे आमच्यावर दबाव आला.'

या सामन्यात शेवटच्या षटकात पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी ७ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करण्यासाठी गिलने नालकंडेला गोलंदाजी करण्यासाठी बोलावलं. याबाबत बोलताना गिल म्हणाला की, ' ज्याप्रकारे त्याने गेल्या सामन्यात गोलंदाजी केली आणि या सामन्यात ७ धावांची गरज होती. त्यामुळे आमच्यासाठी ही मोठी गोष्ट नव्हती.'

पंजाबकडून आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग हे विजयाचे हिरो ठरले. दोघांनी मिळून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. गिलने या दोघांचंही कौतुक केलं. 'ज्या लोकांना तुम्ही नाही पाहिलं, ते या स्पर्धेत शानदार खेळ करतील. हेच आयपीएल स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे.' (Cricket news in marathi)

पंजाबचा शानदार विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर राहुल तेवतियाने २३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने ४ गडी बाद १९९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून शशांक सिंगने ६१ धावांची खेळी केली. तर आशुतोष सिंगने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबने ३ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT