चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. शुभमन गिल (Shubman Gill Fined By BCCI) विरुद्ध ऋतुराज गायकवाड या दोन्ही युवा खेळाडूंमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळणार असं वाटलं होतं. मात्र होम ग्राऊंडवर चेन्नईच्या खेळाडूंनी शानदार खेळ करत गुजरात टायटन्स संघावर एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान या पराभवानंतर शुभमन गिलला दुहेरी धक्का बसला आहे.
शुभमन गिलवर आयपीएलकडून मोठी कारवाई..
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली होती. होम ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला. मात्र दुसऱ्या सामन्यात चेन्नईने गुजरातवर ६३ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर शुभमन गिलवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करत असलेल्या गुजरात टायटन्स संघाला दिलेल्या वेळेत षटकं पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटची कारवाई करत गिलवर १२ लाखांचा दंड आकारला आहे. (Cricket news in marathi)
काय सांगतो स्लो ओव्हर रेटचा नियम?
स्लो ओव्हर रेटचा फटका कर्णधाराला बसतो. पहिल्यांदा स्लो ओव्हर रेटची कारवाई झाल्यास कर्णधारावर १२ लाखांचा दंड आकारला जातो. त्यानंतर दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची कारवाई झाल्यास कर्णधारावर २४ लाखांचा दंड आकारला जातो. तर संघातील उर्वरीत १० खेळाडूंवर ६ लाख दंड किंवा त्यांच्या मॅच फीवर २५ टक्के दंड आकारला जातो. हीच चूक तिसऱ्यांदा केल्यास कर्णधारावर ३० लाखांचा दंड आणि एक सामन्याचा बॅन लागतो. तर संघातील उर्वरित खेळाडूंवर १२ लाख किंवा मॅच फीच्या ५० टक्के दंड आकारला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.