Viral Six Video instagram
क्रीडा

Viral Six Video: नाद केला पण वाया नाही गेला..तुटलेली बॅट अन् फलंदाजाचा थेट मैदानाबाहेर षटकार; हटके शॉटचा Video पाहा

Viral Cricket Video: या हटके शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Viral Six Video:

कधी कधी क्रिकेटच्या मैदानावर असं काही घडतं ज्यावर कोणालाच विश्वास बसत नाही. तुम्ही आतापर्यंत क्रिकेटमध्ये हटके शॉट्स पाहिले असतील. एमएस धोनी हा आपल्या हेलिकॉप्टर शॉटसाठी ओळखला जायचा.

तर तिलकरत्ने दिलशान दिल स्कूपसाठी, सचिन तेंडूलकर आपल्या स्ट्रेट ड्राईव्हसाठी आणि पीटरसन आपल्या अलटी पलटी शॉटसाठी ओळखला जायचा.

मात्र तुम्ही कधी तुटलेल्या बॅटने फलंदाजाला षटकार मारताना पाहिलंय का? नाही ना? नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात फलंदाजाने तुटलेल्या बॅटने षटकार मारला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा वुमेन्स बीग बॅश लीग स्पर्धेतील आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाज ग्रेस हॅरीस या स्पर्धेत ब्रिसबेन हिट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिने या स्पर्धेत तुटलेल्या बॅटने षटकार मारला आहे.

आपली बॅट तुटणार आहे हे तिला आधीच जाणवलं होतं. मला बॅट बदलून हवी आहे,असं ती म्हणाली. त्यानंतर ती म्हणाली की, मी याच बॅटने खेळणार आणि षटकारही मारणार. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तिने षटकार मारला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

ब्रिसबेन हिट आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात झालेल्या सामन्यात ब्रिसबेन हिट संघाने ५० धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात ब्रिसबेन हिटने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद २२९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पर्थ स्कॉर्चर्स संघाचा डाव ८ गडी बाद १७९ धावांवर संपुष्टात आला.

हॅरिस ग्रेसची तुफान फटकेबाजी..

या सामन्यात ग्रेस हॅरिसने ५९ चेंडूंचा सामना करत नाबाद १३६ धावांची खेळी केली. तिने १५ व्या षटकातील पहिलाच चेंडू सीमारेषेच्या बाहेर बाहेर पाठवला. तिच्या एका शॉटमुळे तिची बॅटही तुटली. तिने आपल्या खेळीदरम्यान १२ चौकार आणि ११ षटकार मारले. या खेळीच्या बळावर तिची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT