World Cup 2023: वर्ल्डकप सुरू असतानाच भारतीय खेळाडूंवर BCCI ने घातली बंदी! जाणून घ्या कारण

Indian Cricket Team News: इंग्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंवर बंदी घातली आहे.
 Indian Cricket Team News
Indian Cricket Team NewsSAAM TV
Published On

Indian Cricket Team News:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. रविवारी न्यूझींलडविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने या स्पर्धेतील सलग पाचवा विजय मिळवला. सलग ५ सामने जिंकून भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

आता भारतीय संघाचा पुढील सामना २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरूद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे.

इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना विश्रांती करण्यासाठी दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. यादरम्यान भारतीय खेळाडूंना धरमशाळेत फिरायला जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. मात्र काही बंधनं देखील घातली आहेत. फिरायला गेल्यानंतर भारतीय खेळाडूंना ट्रेकिंग करता येणार नाही. तसेच खेळाडूंना पॅराग्लायडिंग करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारतीय खेळाडूंना ट्रेकिंग न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर स्पर्धा सुरू असताना कुठल्याही खेळाडूला पॅराग्लायडिंग करता येणार नाही. हे कराराच्या विरोधात जाऊ शकते. असं अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. (Latest sports updates)

 Indian Cricket Team News
World Cup Points Table: बांगलादेश सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर!पाकिस्तानसह या ४ संघांवरही टांगती तलवार

इंग्लंडविरूद्ध होणार सामना..

भारतीय संघाने सुरुवातीच्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. स्पर्धेतील सहावा सामना इंग्लंडविरूद्ध होणार आहे. हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील असा पहिलाच संघ आहे, ज्या संघाने सुरूवातीचे पाचही सामने जिंकले आहेत.

 Indian Cricket Team News
World Cup 2023: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

पाचही सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना मारली बाजी..

भारतीय संघाने या स्पर्धेतील पाचही सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला होता, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर ८ गडी राखून, तिसऱ्या सामन्यात पकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला होता. तर चौथ्या सामन्यात बांगलादेशवर ७ गडी राखून आणि न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com