TEAM INDIA yandex
Sports

Team India News: टीम इंडियासाठी गुड न्यूज! स्टार गोलंदाज कमबॅकसाठी सज्ज

Mohammed Shami Comeback: भारतीय संघातून बाहेर असलेल्या स्टार गोलंदाजाने भारतीय संघात कमबॅक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami Will Play Ranji Trophy: भारतात गेल्या वर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत फायनल गाठली. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या संपूर्ण स्पर्धेत मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. दरम्यान याच कामगिरीची दखल घेत, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका कार्यक्रमात शमीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्याने लवकर परतण्याची इच्छा व्यक्त केली.

वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर शमीला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावं लागलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून तो संघाबाहेर आहे. मात्र त्याचे कमबॅक करण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. शमी म्हणाला की, ' निश्चितच, मला आगामी हंगामात बंगालसाठी खेळायचे आहे. मी २ ते ३ सामने तरी खेळणार आहे. यामुळे मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करायला मदत होणार आहे. मी एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे, जेव्हा मी फिट होईल तेव्हा मला खेळण्यासाठी मैदानात उतरायचं आहे.'

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे मानले आभार

तसेच त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की,' मी बंगालचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. माझा जन्म युपीमध्ये झाला पण मला खरी ओळख बंगालने दिली. हा २२ वर्षांचा प्रवास आहे, की मी जे काही आहे त्यात बंगालचा मोलाचा वाटा आहे. मला वाटतं की, महिला क्रिकेटही पुढे जावं. मला पाहून आनंद होतोय की, आपलं कुटुंबही या गोष्टीला समर्थन करत आहे.'

बॉर्डर -गावसकर ट्रॉफी बाबत बोलताना म्हणाला

' मला वाटतं की, भारत ही मालिका जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. गेल्या वेळेस आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये युवा खेळाडूंसह मैदानात उतरलो होतो. त्यावेळी आम्ही श्रेष्ठ आहोत हे सिद्ध केलं होतं. यावेळी दोन्ही संघांमध्ये कांटे की टक्कर होणार, यात काहीच शंका नाही. ' असं मोहम्मद शमी म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Maharashtra Forts : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक! महाराष्ट्रातील ७ अभेद्य किल्ले, शत्रूला जिंकणे होतं कठीण

Maharashtra News Live Update: ऊस दराच्या मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत,यांचा मशाल मोर्चा

IND vs NZ : भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजी कोण करणार? पाहा प्लेईंग ११

Actor Threat Case : बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT