मोहम्मद शमीच्या पुनरागमनाविषयी मोठी अपडेट समोर आलीय. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी भारताचा दिग्गज गोलंदाज 'लाला' म्हणजे मोहम्मद शमी कधी पुनरागमन करणार याबाबत माहिती दिलीय. शमीची प्रकृती चांगली आहे आणि तो लवकरच टीम इंडियामध्ये परत येऊ शकतो. शमीने गोलंदाजीचा सराव सुरू केलाय. मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत तो पुनरागमन करू शकतो, अशी माहिती आगरकरने दिलीय. ईएसपीएन क्रिक इन्फोच्या अहवालानुसार, शमी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजी करेल, असं म्हटलंय.
२०२३ च्या एकदिवशीय वर्ल्डकपमध्ये शमीच्या गुडघ्याला दुखपात झाली होती, तेव्हापासून शमी टीम इंडियाच्या बाहेर आहे. तंदुरुस्ती आधारे त्याचा डिसेंबर-जानेवारीमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेमधील दोन सामन्यांच्या मालिकेत संघात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर त्याला या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती.
फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटीसाठी शमी परत येण्याच्या आशेने एनसीएमध्ये परतला, परंतु त्याच्या उजव्या घोट्याला सतत सूज येत होती. त्यानंतर त्याला गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आलाय. ज्यामुळे त्याला आयपीएल २०२४ मधूनही बाहेर काढण्यात आले. भारताला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात शमीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने अवघ्या सात सामन्यांमध्ये १०.७० च्या सरासरीने आणि १२.२० च्या स्ट्राइक रेटने २४ विकेट घेतल्या होत्या.
भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत शमी कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली. तर वनडे मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना ४३ दिवसांची विश्रांती मिळाली असून ४३ दिवसानंतर न भारतीय संघ १९ सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. विश्रांतीनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.