भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. या क्रिकेट बोर्डमध्ये काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. तुमचं हे स्वप्न सत्यात उतरू शकतो. बीसीसीआयने नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. काय आहे नोकरी आणि कसं करायचा अर्ज? जाणून घ्या.
बीसीसीआयमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी अनुभवी उमेदवाराची गरज आहे. या पदाचा कार्यकाळ ५ वर्ष इतका असणार आहे. यासह या पदासाठी कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करायचा हे ही जाहिरातीत सांगण्यात आलं आहे.
या पदासाठी निवड झालेला उमेदवार जनरल मॅनेजर म्हणून काम करेल. ज्यात त्याला मार्केटिंगही करावी लागणार आहे. मार्केटिंगसाठी रणनीती आखण्याचं काम हे जनरल मॅनेजरचं असणार आहे. या जॉबसाठी अप्लाय करणारा उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं. तसेच त्याचं वय हे ५५ वर्षांपेक्षा कमी असावं. यासह त्याने एमबीए केलेलं असावं. हे सर्व असून त्याचा अनुभव हा १५ वर्षांपेक्षा अधिकचा असावा. तरच तो या पदासाठी पात्र ठरेल.
बीसीसीआयमध्ये काम करणार म्हणजे पगार भरगच्च मिळणारच की. माध्यमातील वृत्तानुसार बीसीसीआय जनरल मॅनेजर पदावर काम करणाऱ्यांना ३ ते ४ कोटी रुपये पगार देते. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांना भरगच्च पगार मिळतो.
तुम्ही जर या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तुम्ही बीसीसीआयच्या अधिकृत ईमेल आयडीवर आपला बायोडेटा पाठवू शकता.
नुकतेच भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने शानदार खेळ केला. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली. तर वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता.त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.