T20 World Cup 2024: मोठी बातमी! विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, स्मृती मंधाना उपकर्णधार, श्रेयंका पाटीललाही संधी

T20 World Cup 2024: महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली.
IND
INDSaam Digital
Published On

Women T20 World Cup 2024 : महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधाना हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शेफाली वर्मा, राधा यादव आणि जेमिमा रोड्रिग्ज यांनाही टीम इंडियात स्थान मिळाले आहे. महिला टी२० विश्वचषकाची सुरुवात ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारताचा सलामीचा सामना न्यूझीलंडच्या महिला संधासोबत होणार आहे. हा सामना ४ ऑक्टोबर रोजी यूएईमध्ये होणार आहे.

IND
Indian Hockey Team: कर्णधार असावा तर असा! मेडल स्वीकारताना हरमनप्रीतने केलं असं काही; पाहा VIDEO

महिला टी२० विश्वचषकातील भारतीय संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष आणि यास्तिका भाटिया या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, हेमलता, शोभना आणि राधा यादव यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.

आयसीसी महिला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्टिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी , रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन

महिला टी२० विश्वचषकात १० संघ सहभाग घेणार त्यांच्यामध्ये चुरशीच्या लढती होणार आहे. हे संघ दोन गटात विभागलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. दरम्यान ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे. स्पर्धेपूर्वी २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने खेळवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com