Indian Hockey Team: कर्णधार असावा तर असा! मेडल स्वीकारताना हरमनप्रीतने केलं असं काही; पाहा VIDEO

Harmanpreet Singh And PR Sreejesh: भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने असं काही केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Indian Hockey Team: कर्णधार असावा तर असा! मेडल स्वीकारताना हरमनप्रीतने केलं असं काही; पाहा VIDEO
harmanpreet singh instagram
Published On

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. भारतीय हॉकी संघाने स्पेनला २-१ ने धूळ चारत कांस्यपदक पटकावलं. दरम्यान नेदरलँड्स आणि जर्मनी यांच्यातील फायनलचा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला कांस्यपदक देण्यात आलं. ज्यावेळी भारतीय खेळाडू पदक घेण्यासाठी पोडियमवर आले. त्यावेळी असं काही घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली होती. दरम्यान या स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ करुन दाखवला आणि बॅक टू बॅक कांस्यपदक पटकावलं. ज्या क्षणाची कोट्यवधी भारतीय आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण अखेर आलाच. भारतीय खेळाडू सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक घेण्यासाठी पोडिअमवर जाणार होते.ज्यावेळी भारतीय खेळाडू पोडिअमवर चढले त्यावेळी सर्व खेळाडूंनी हात उंचावले.

Indian Hockey Team: कर्णधार असावा तर असा! मेडल स्वीकारताना हरमनप्रीतने केलं असं काही; पाहा VIDEO
Paris Olympics 2024 Hockey Semi Final: गोल्डचं स्वप्न मावळलं; ब्रॉन्झची आशा कायम, सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव

हरमनप्रीत सिंगने जिंकलं मन

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेदरलँड्सने सुवर्ण पदकावर नाव कोरलं. तर जर्मनीने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. भारतीय संघ पदकाचा स्वीकार करत असताना असं काही घडलं, जे पाहून फॅन्सलाही कर्णधार हरमनप्रीत सिंगचा अभिमान वाटला. हरमनप्रीतने आपलं पदक निवृत्ती जाहीर केलेल्या पीआर श्रीजेशच्या गळ्यात घातलं. त्यानंतर संघातील अन्य खेळाडूंनीही असंच काहीसं केलं. या हटके सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Indian Hockey Team: कर्णधार असावा तर असा! मेडल स्वीकारताना हरमनप्रीतने केलं असं काही; पाहा VIDEO
Paris Olympics 2024, Hockey: भारताची सेमिफायनलमध्ये थाटात एन्ट्री! ग्रेट ब्रिटेनला शूट- 'आऊट' करत रचला इतिहास

भारताने स्पेनला धूळ चारत पटकावलं रौप्यपदक

भारतीय संघाला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र सेमिफायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर कांस्यपदकासाठीच्या सामन्यात भारत आणि स्पेन हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ केला आणि सलग दुसऱ्यांदा कांस्यपदकावर नाव कोरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com