team india twitter
Sports

IND vs NZ: टीम इंडियासाठी गुड न्यूज! दुसऱ्या कसोटीपूर्वी स्टार खेळाडू फिट

India vs New Zealand 2nd Test, Rishabh Pant: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ 2nd Test, Rishabh Pant: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, रिषभ पंत या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. रिषभ पंत पूर्णपणे फिट आहे.

या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्याऐवजी, ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात आला. मात्र दुखापतग्रस्त असूनही रिषभ फलंदाजीला आला आणि त्याने ९९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारतीय संघाचा गडगडलेला डाव रिषभ पंतने सावरला. दुसरा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यापूर्वी रिषभ पंत फिट होणं हे भारतीय संघासाठी शुभसंकेत आहेत. रिषभ पंतची प्लेइंग ११ मधील जागा फिक्स आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रिषभ पंत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुर्णपणे फिट आहे. या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी इंजेक्शन घेतल्यानंतर त्याला वेदना जाणवल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याला बरं वाटत होतं. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसेल.

डिसेंबर २०२२ मध्ये रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात, त्याच्या गुडल्याला जबर मार लागला होता. आता यष्टीरक्षण करताना, त्याच गुडघ्यावर चेंडू लागल्याने त्याला असाह्य वेदना जाणवल्या. मात्र त्याने मैदान सोडलं नव्हतं. संघ अडचणीत असताना तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT