lsg twitter
Sports

IPL 2025: लखनऊची ताकद दुपटीने वाढणार! स्टार खेळाडू कमबॅकसाठी सज्ज

Mayank Yadav Started Practising For IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेआधी लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार गोलंदाज कमबॅकसाठी सज्ज झाला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार येत्या २२ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेला सुरु व्हायला अवघे ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. काही खेळाडू असे आहेत, जे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर काही खेळाडू असे आहेत, जे दुखापतीतून सावरुन कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत.

दुखापतीतून सावरणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मयांक यादवचा देखील समावेश आहे. मयांक आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळतोय. मयांकला गेले काही महिने दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. मात्र आता तो कमबॅकसाठी सज्ज झाला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून पदार्पण करणाऱ्या मयांक यादवने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याची गोलंदाजीतील गती आणि अचूक लाईन लेंथवरील गोलंदाजी पाहून लखनऊने त्याला ११ कोटी देऊन रिटेन करण्याचा निर्णय घेतला. मयांकला लखनऊने २० लाखांची बोली लावून संघात घेतलं होतं.

त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधीही मिळाली होती. मात्र त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला, तेव्हापासून तो कमबॅक करु शकलेला नाही. मैदानावर कमबॅक करण्यासाठी तो कसून मेहनत करताना दिसून येत आहे. त्याचा गोलंदाजीचा सराव करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कधीपर्यंत फिट होणार?

मयांक यादव बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना तो दुखापतग्रस्त झाला होता. तो अजूनही दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्नात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तो स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी असा आहे लखनऊ सुपरजायंट्सचा संघ:

रिषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयांक यादव, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, एडेन मार्करम, मिशेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिंस यादव, युवराज चौधरी, आरएस हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीट्ज़के, मोहसिन खान,मणिमारन सिद्धार्थ, दिगवेश सिंग, शाहबाज अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT