भारतीय संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.
अक्षर पटेल २९ धावा करत माघारी परतला आहे.
भारतीय संघाच्या २०० धावा पूर्ण झाल्या आहेत.
श्रेयस अय्यर ४८ धावांवर तंबूत परतलाा आहे.
रोहित शर्मा ७६ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
विराट कोहली १ धावांवर पायचित होऊन माघारी परतला आहे.
शुभमन गिल ३१ धावा करत माघारी परतला आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय संघाचं शतक पूर्ण झालं आहे.
कॅप्टन रोहित शर्माने ४१ बॉल्समध्ये आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं आहे.
रोहित शर्माने चौकार, षटाकारांचा पाऊस करत आहे. तर भारताचं अर्धशतक पूर्ण झालं आहे.
सलामीला उतरलेल्या रोहित-गिलच्या जोडीने तेज तर्रार सुरुवात केली आहे. ५ ओव्हरनंतर भारताचा स्कोअर ३७ -० आहे.
न्यूझीलंडचा डाव संपला आहे. ५० ओव्हरमध्ये न्यूझीलंडने ७ विकेट्स गमावून २५१ धावा करत भारताला २५२ धावांचं आव्हान दिले आहे.
न्यूझीलंडला सातवा धक्का बसला आहे. कर्णधार मिचेल सँटनर 8 धावा करुन रन आऊट झाला आहे.
मोहम्मद शमीला पहिली विकेट मिळाली आहे. ६३ धावांवर खेळत असलेल्या डॅरेल मिचेलला बाद केले.
न्यूझीलंडने २०० धावांचा टप्पा पार केला.
मिचेलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं
न्यूझीलंडच्या संघाला पाचवा धक्का बसला आहे. वरुण चक्रवर्तीने ग्लेन फिलिप्सला बाद केले आहे. फिलिप्स ३४ धावांवर बाद झाला.
न्यूझीलंडने १५० धावांचा टप्पा पार केला आहे. डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स फलंदाजी करत आहेत.
रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर माजी कर्णधार टॉम लॅथम बाद झाला. १०८ वर न्यूझीलंडने चौथी विकेट गमावली आहे.
३ विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या टीमने १०० रन्स पूर्ण केले आहेत. टॉम लेथम आणि डॅरेल मिचेल सध्या फलंदाजी करतायत
15 ओव्हर्स झाल्या असून आतापर्यंत टीम इंडियाचा दबदबा दिसून आला. 15 षटकांनंतर न्यूझीलंडने तीन गडी गमावून 83 रन्स केलेत.
न्यझीलंडला तिसरा धक्का बसला आहे. केन विलियम्सन स्वस्तात माघारी परतला आहे.
न्यूझीलंडला ओपनर यंगच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. यंग अवघ्या १५ रन्सवर माघारी परतला आहे.
७ ओव्हर्स पूर्ण होऊन देखील टीम इंडियाला एकही विकेट मिळालेली नाही. न्यूझीलंडने ५० रन्स पूर्ण केले आहेत.
भारताकडून चौथी ओव्हर हार्दिक पांड्याने केली. या ओव्हरमध्ये किवी खेळाडूंनी खूप धावा केल्या. रचिनने चौथ्या चेंडूवर सिक्स आणि पाचव्या चेंडूवर फोर मारली. मग पुढचा चेंडू वाईड झाला आणि नंतर रचिनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला.
प्रथम फलंदाजी करतान मोठी धावसंख्या उभारण्याचा आम्ही प्रयत्न करूयात. दुबईतील हे चांगले स्टेडियम आहे, येथे अंतिम सामना रंगतदार होईल. पाकिस्तानमध्ये आम्ही जे काही केलं, त्यापेक्षा इथं वेगळं करण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाला चांगले खेळताना आम्ही पाहिलेय. बोर्डावर जास्तीत जास्त धावा लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, पाहूयात काय होतेय ते. प्रत्येक सामन्यावेळी आमच्या संघातील वेगवेगळ्या खेळाडूने जबाबदारी उचलली आहे. सांघिक खेळाच्या जोरावर विजय मिळवला आहे. मॅट हेनरी दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. नॅथन स्मिथ याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय.
दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यास काहीच हरकत नाही. खेळपट्टी चांगली आहे, जास्त काही बदल झालेला दिसत नाही. आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करत आहे, न्यूझीलंडला कमीत कमी धावसंख्येवर रोखण्यावर भर असेल. तुम्ही सामन्यात किती चांगले आणि कसं खेळलात हे दिवसाच्या शेवटी महत्त्वाचे ठरणार आहे.
आम्हाला नाणेफेकीची कोणतेही टेन्शन नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहे. हा आणखी एक महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यात काय चांगलं करता येईल, यावर आमचा भर असेल. न्यूझीलंड खूपच चांगला संघ आहे. आमच्यापुढे आणखी एक चॅलेंज असेल. आजच्या सामन्यासाठी संघात कोणताही बदल नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम असेल.
रचिन रवींद्र, विल यंग, केन विलियम्सन, डॅरेल मिचेल, टॉम लेथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, कायल जेमीसन, नॅथन स्मिथ, विल ओरूर्क
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, वरूण चक्रवर्ती
भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्यात रोहितने शर्माने पुन्हा टॉस गमावला आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करणार आहे.
भारतीय संघाने २००२ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जागा मिळवली. भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये लढत होणार होती. पण पावसाने हजेरी लावली. दोन दिवस पाऊस धो धो कोसळला. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारतीय संघ त्यानंतर २००३ वनेड विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचला होता, पण ऑस्ट्रेलियाने १२५ धावांनी मात दिली होती. भारताने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली होती. भारत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला होता.
भारत आणि न्यूझीलंड वनडे स्वरूपात एकूण ११९ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडिया ६१ सामने जिंकले आहेत. तर किवी टीमने ५० वेळा त्यांना पराभूत केलंय. एक सामना बरोबरीत सुटला आणि उर्वरित ७ वनडे सामन्यांचा निकाल लागला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना यापूर्वीही म्हणजेच २००० मध्ये खेळवला गेला आहे. जेव्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर आले तेव्हा किवी टीम जिंकली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ विकेटच्या मोबदल्यात २६४ रन्स केले होते. न्यूझीलंडने ४९.४ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठून ट्रॉफी जिंकली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत चांगले खेळत आहेत आणि शेवटचा सामना कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.