लखनऊ सुपरजायंट्स संघातील वेगवान गोलंदाज मयांक यादवला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. त्यामुळे तो पुढील सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. आपल्या आयपीएल स्पर्धेची वेगवान सुरुवात करणारा मयांक यादव गेल्या ४ आठवड्यात दुसऱ्यांदा दुखापतग्रस्त झाला आहे. मात्र त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याची ही कामगिरी पाहता बीसीसीआय लवकरच त्याला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.
काही महिन्यांपूर्वीच यश दयाल, उमरान मलिक, विदवथ कावेरप्पा, विशाक विजयकुमार यांना वेगवान गोलंदाजीचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. आता मयांक यादवचाही या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर नॅशनल क्रिकेट अॅकेडमीची स्पोर्ट्स सायन्स आणि मे मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असणार आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने म्हटले की, ' मयांक यादव दुखापतग्रस्त झाला आहे. मात्र ही दुखापत किरकोळ नसल्याचं म्हटलं जात आहे. या दुखापतीतून बाहेर पडायला जास्त वेळ लागणार नाही. लखनऊ सुपर जायंट्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर मयांक यादव खेळताना दिसेल. मात्र साखळी फेरीतील सामन्यांमध्ये तो खेळताना दिसण्याची शक्यता खूप कमी आहे.
मयांक यादवला याच हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्याने ताशी १५६.७ किमीने गोलंदाजी करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याने ६ गडी बाद केले आणि दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कारावर नाव कोरलं.
मात्र दुखापतीनंतर त्याला मैदान सोडावं लागलं. काही दिवस दूर राहिल्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून कमबॅक केलं. मात्र या सामन्यात ३.१ षटक गोलंदाजी केल्यानंतर त्याचा मासपेशी खेचल्या गेल्या आणि त्यानंतर त्याने मैदान सोडलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.