Mayank Yadav Comeback: सामन्याआधीच मुंबईचं टेन्शन वाढलं! लखनऊचा सर्वात खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक

LSG vs MI, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
Mumbai indians tension increased mayank yadav all set to comeback in lsg vs mi match amd2000
Mumbai indians tension increased mayank yadav all set to comeback in lsg vs mi match amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहायचं असेल तर मुंबई इंडियन्स संघाला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकणं गरजेचं असणार आहे. हा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

मयांक यादवचं कमबॅक..

मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना नॉकआऊट सामना असणार आहे. कारण या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. अशी स्थिती असताना लखनऊ सुपरजायंट्स संघाची ताकद आणखी वाढली आहे. कारण दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला मयांक यादव या सामन्यातून कमबॅक करणार आहे.

Mumbai indians tension increased mayank yadav all set to comeback in lsg vs mi match amd2000
IPL 2024 Points Table: राजस्थाननंतर KKR ची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल! दिल्लीचं टेन्शन वाढलं; पाहा गुणतालिका

मयांक यादवने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने पदार्पणाच्याच सामन्यात आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच्याकडे षटकातील ६ चेंडू ताशी १५० च्या गतीने टाकण्याची क्षमता आहे.

त्याची गोलंदाजी पाहून त्याला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरत होती. मात्र नेमका तेव्हाच तो दुखापतग्रस्त झाला. त्याला या स्पर्धेतील ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ६ गडी बाद केले.

Mumbai indians tension increased mayank yadav all set to comeback in lsg vs mi match amd2000
Tamannaah Bhatia News : IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

मयांक यादव खेळणार?

मयांक यादव पूर्णपणे फिट असल्याची माहिती गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक अॅल्बी मॉर्कल म्हणाला की, ' मयांक यादव पूर्णपणे फिट आहे. त्याने सर्व फिटनेस चाचण्याही यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्याने गेल्या आठवड्यापासून सराव करायला सुरुवात केली असून तो पुन्हा एकदा फलंदाजांची डोकेदुखी वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे.' असं मॉर्कल म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com