Sakshi Sunil Jadhav
अनेक महिलांना केस भुवया वाढत नसल्याच्या समस्या असतात. त्यामुळे त्यांना सतत पेन्सिलचा वापर करावा लागतो.
प्रत्येक महिलेला आपल्या भुवया जाड, दाट आणि चमकदार असाव्यात असं वाटतं. पण प्रत्येकालाच जाड भुवयां नसतात.
काहीवेळेस अनेक महिलांना आयब्रो असून त्या व्यवस्थित ठळक दिसत नाहीत किंवा एकदा आयब्रो केले की वाढतच नाहीत.
पुढील उपायांनी तुम्ही तुमच्या भुवया जास्त वेगाने वाढवू शकता. जास्त पैसे घालवण्याची गरज नाही, आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
पुढील उपायांनी तुम्ही तुमच्या भुवया जास्त वेगाने वाढवू शकता. जास्त पैसे घालवण्याची गरज नाही, आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
कांद्याच्या रसात सल्फर, खनिज, व्हिटॅमिन बी आणि सी, तसेच सेलेनियम असल्यामुळे तो केसांच्या वाढीसाठी प्रभावी मानला जातो. तुम्ही एक दिवसाआड तुमच्या भुवयांना हा कांद्याचा रस लावू शकता.
ऑलिव्ह ऑइलमुळे तुमच्या भुवयांची वाढही वेगाने होऊ शकते. त्यात व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए असते, जे केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतं.
तुम्ही टी ट्री ऑइलने मसाज सुद्धा करू शकता. हे तेल एक ओलसर थर तयार करतं, जे पेशी आणि केसांच्या मुळांच्या ग्रोथसाठी चांगलं असतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.