ind vs pak saam tv
Sports

IND vs PAK: क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! भारत- पाकिस्तान ३ वेळा येणार आमनेसामने; तारीख नोट करुन ठेवा

India vs Pakistan Match Dates: भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ एकदा दोनदा नव्हे, तर तब्बल ३ वेळा आमनेसामने येणार आहेत. दरम्यान केव्हा होणार हे सामने? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने अपेक्षापेक्षाही जास्त वाईट कामगिरी केली. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र या स्पर्धेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. भारत- पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली.

या दोन्ही सामन्यांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना होणार, असं वाटलं होतं. मात्र विराट कोहलीच्या शतकामुळे हा सामना एकतर्फी राहिला. आता क्रिकेट फॅन्सला भारत - पाकिस्तान सामना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी फार वेळ वाट पाहावी लागणार नाहीये. याच वर्षी हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.

पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरु आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु असताना, आशिया कप २०२५ स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एशियन क्रिकेट काउंसिलची बैठक पार पडली.

या बैठकीत आशिया कप स्पर्धेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजन येत्या सप्टेंबर महिन्यात केले जाणार आहे. या स्पर्धेत आशियातील ८ संघ खेळताना दिसून येणार आहे. यादरम्यान भारत- पाकिस्तान संघ खेळताना दिसून येऊ शकतात.

भारत- पाकिस्तान ३ वेळेस येणार आमनेसामने

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. हे पाहता आशिया कप स्पर्धेचे आयोजन देखील टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाऊ शकते. या स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार, ८ संघांना ४-४ च्या गटात विभागलं जाईल. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात असतील. त्यामुळे दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने येतील. त्यानंतर सुपर ४ मध्येही दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. जर हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले. तर हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते.

कुठे होणार स्पर्धा?

या स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे आहे. मात्र स्पर्धेचे आयोजन भारताबाहेर केले जाऊ शकते. कारण पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार नाही. त्यामुळे बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन भारताबाहेर केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: नांदगावला धुवाधार पाऊस लेंडी नदीला पुर .रेल्वे अंडरपास 3 फूट पाण्याखाली

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

Horoscope Saturday : गोपाळकाला जाणार या 6 राशींसाठी लाभाचा, प्रवासातून होईल फायदा; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT