Champions Trophy: इंग्लंड बाहेर, भारत- अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? वाचा कसं असेल समीकरण

Semi Final Scenario For Afghanistan In ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान अफगाणिस्तानलाही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.
Champions Trophy: इंग्लंड बाहेर, भारत- अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? वाचा कसं असेल समीकरण
afghanistantwitter
Published On

अफगाणिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये काय सामना रंगला. सुरुवातीला अफगाणिस्तानने ३२५ धावांचा डोंगर उभारला. अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज पाहून असं वाटलं होतं की, अफगाणिस्तान हा सामना एकहाती जिंकेल. मात्र इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत शानदार शतकी खेळी केली.

इंग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र शेवटी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सामना फिरवला. या विजयासह अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान अफगाणिस्तानसाठी कसं असेल सेमी फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? समजून घ्या.

Champions Trophy: इंग्लंड बाहेर, भारत- अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? वाचा कसं असेल समीकरण
Champions Trophy: पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणार? IND vs BAN सामन्यानंतर कसं आहे पॉईंट्स टेबल?

अफगाणिस्तानने आतापर्यंत या स्पर्धेत २ सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता इंग्लंडला हरवून अफगाणिस्तानने कमबॅक केलं आहे. अफगाणिस्तानचा शेवटचा सामना २८ फेब्रुवारीला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

ऑस्ट्रेलियालाही सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी होती. कारण या संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला दुसरा सामना पावसामुळे धुतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १–१ गुण दिला गेला. याचा फटका दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना बसला.

Champions Trophy: इंग्लंड बाहेर, भारत- अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? वाचा कसं असेल समीकरण
IND vs BAN Highlights: गिलने पुन्हा जिंकलं 'दिल', बांगलादेशचा हार्टब्रेक करत टीम इंडियाची विजयी सुरुवात

असा मिळू शकतो दक्षिण आफ्रिकेला प्रवेश

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो सामना असणार आहे. जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर हा संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र हा सामना गमावला किंवा पावसामुळे रद्द झाला तर, अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला हा सामना जिंकावाच लागेल.

Champions Trophy: इंग्लंड बाहेर, भारत- अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? वाचा कसं असेल समीकरण
IND vs BAN Highlights: गिलने पुन्हा जिंकलं 'दिल', बांगलादेशचा हार्टब्रेक करत टीम इंडियाची विजयी सुरुवात

भारत – अफगाणिस्तान सेमीफायनल होणार?

भारतीय संघाने जर शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला, तर भारतीय संघ ग्रूप ए मधून अव्वल स्थानी पोहचेल. जर अफगाणिस्तानचा संघ ग्रुप बी मध्ये दुसऱ्या स्थानी राहिला तर, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमीफायनलचा सामना होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com