Glenn Maxwell  Twitter
क्रीडा

World Cup : मॅक्सवेलचा बिग शो; पायाला दुखापत झाली असतानाही ठोकलं द्विशतक

Bharat Jadhav

Glenn Maxwell Double Century :

अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सामना चांगलाच रोमांचक झाला. अफगाणिस्तानने दिलेल्या २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची मोठी भांबेरी उडाली. संघाच्या अवघ्या शंभर धावा झाल्या नसताना सुद्धा कांगारूचा अर्धा संघ तंबूत परतला होता. परंतु ग्लेन मॅक्सवेलने सर्व गेम पलटला. पायाला दुखापत झाली असताना सुद्धा तडाखेबाज फलंदाजी करत त्याने द्विशतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीमुळे तो ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरला. (Latest News)

मॅक्सवेलच्या खेळीमुळे वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाचा कंलक पुसला गेलाय. कारण, वर्ल्ड कपच्या इतिहासात आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला नेहमी पराभव पत्कारावा लागत होता. आजही तीच स्थिती कांगारूच्या संघावर आली होती, जर २२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुजीबने मॅक्सवेलचा झेल घेतला असता. त्यावेळी तो अवघ्या ३३ धावांवर बाद झाला असता. ऑस्ट्रेलिया कदाचित परत एकदा आव्हानाचा पाठलाग करताना पराभूत झाली असती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, निम्मा संघ तंबूत परतल्याने आजही ऑस्ट्रेलियाच्या संघाने आत्मविश्वास गमावला होता. सर्वांच्या नजरा ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीवर होत्या. मॅक्सवेललाही त्याची भूमिका माहिती होती. अफगाणिस्तानच्या संघाने त्यांचा निम्मा संघ तंबूत बसवला होता. आता जे काही करायचे आहे त्यालाच करायचं आहे. या विचाराने त्याने दुखापत झाली असतानाही खेळपट्टीवर उभा राहण्याचा हट्ट धरत त्याने द्विशतक केलं आणि संघाला विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तानच्या संघाने दिलेल्या २९२ धावांचा पाठलाग करताना मॅक्सवेलने वर्ल्ड कपमधील दुसरं शतक झळकावलं. याआधी मॅक्सवेलने नेदरलँडच्या संघाविरुद्धात ४० चेंडूत शतक ठोकलं होतं. जे एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात जलद शतक होतं. फलंदाजी करत असताना मुजीबने जीवनदान दिल्यानंतर मॅक्सवेलने मोठी खेळी करत अफगाणच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मग तो राशिद खान असो का नूर अहमद, जो गोलंदाज समोर आला त्याला त्याने मनसोक्त धुतलं.

त्याने कर्णधार पॅट कमिन्ससोबत शतकी भागीदारी केली, मात्र या भागीदारीत सर्वाधिक धावा मॅक्सवेलने केल्या. या दोघांमध्ये १२५ धावांची भागीदारी झाली तेव्हा कमिन्सने केवळ ११ धावा केल्या होत्या. यावरून मॅक्सवेलने आपल्या फटकेबाजीने अफगाण गोलंदाजांना किती झोडपलं असेल याचा अंदाज लावता येईल.

दरम्यान मॅक्सवेलला बाद करण्यासाठी अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्ला शाहिदीने खूप युक्त्या केल्या. पण मॅक्सवेलने त्याची प्रत्येक युक्ती अयशस्वी केली. मॅक्सवेलने ३३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत शतक पूर्ण केलं. यासाठी मॅक्सवेलने ७६ चेंडूंचा सामना केला. शतक झळकावल्यानंतर त्याला पायात दुखापत झाली पण तो टिकून राहिला आणि आपल्या संघासाठी धावा करत राहिला. फिजिओला दोनदा मैदानात यावे लागले. त्यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. पण मॅक्सवेल थांबला नाही. लंगड्या पायाने धावत तो धावा काढू लागला आणि संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT