विश्वचषकात आजच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात मॅक्सवेलच्या वादळी द्विशकताच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून विजय मिळविल्याने त्यांचा सेमी फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Marathi News)
पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तानचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ग्लेन मॅक्सवेलने २०१ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी खेळीनंतर क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ गडी गमावून २९१ धावा केल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ अवघ्या ७० धावांवर माघारी परतला.
ऑस्ट्रेलियाची पडझड झाल्यानंतर संघाची कमान ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सने सांभाळली. निम्मा संघ बाद झाल्याने संकटात सापडलेल्या संघाला दोघांनी विजय मिळवून दिला. यावेळी ग्लॅन मॅक्सवेलने धमाकेदार द्विशतक ठोकलं.
इब्राहिमने खेळली तुफानी खेळी
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने ५० षटकात ५ गडी गमावून २९१ धावा कुटल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरानने १२९ धावांची खेळी खेळली. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने शतकी खेळी खेळली.
शेवटच्या काही षटकात रशिद खानने १८ चेंडूत ३५ धावा कुटल्या. या धावा करताना २ चौकार आणि ३ षटकार लगावले. ऑस्ट्रेलियाकडून जोशने ९ षटकात ३९ धावा देऊन सर्वाधिक २ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.