Michael Vaughan: विराटला Selfish म्हणणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूवर इंग्लंडचा दिग्गज भडकला, ट्वीट करत म्हणाला..

Michael Vaughan On Virat Kohli: मायकल वॉनने विराटला स्वार्थी म्हणणाऱ्या मोहम्मद हफीजला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
 virat kohli mohammed hafeez
virat kohli mohammed hafeezsaam tv news
Published On

Michael Vaughan On Virat Kohli:

भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४९ वे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

वाढदिवशी केलेल्या या खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हफीजने विराटला स्वार्थी म्हणत जोरदार टीका केली आहे. या टीकेला इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मायकल वॉनला हफीजचं बोलणं मुळीच पटलं नाही. त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहीले की,'कम ऑन मोहम्मद हफीज भारतीय संघाने उत्तम खेळ करत आठ संघांना पराभूत केलं आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ४९ शतकं झळकावली आहेत. गेल्या सामन्यात आव्हानात्मत खेळपट्टीवर महत्वाची खेळी केली होती. त्याचा संघ २०० धावांनी वियजी झाला आहे. हे खूप चुकीचं आहे.' (Latest sports updates)

काय म्हणाला मोहम्मद हफीज?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना मोहम्मद हफीज म्हणाला की,'शेवटच्या २ षटकात धावांची गती वाढवून भारतीय संघ आणखी मोठी धावसंख्या उभारू शकले असते. मात्र विराट कोहलीला आपलं शतक पूर्ण करायचं होतं.'

भारतीय संघाने या सामन्यात ५० षटक अखेर ५ गडी बाद ३२६ धावा केल्या. भारतीय संघाकडून १२१ चेंडूंचा सामना करत १०१ धावांची खेळी केली.

तर श्रेयस अय्यरने ७७ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ८३ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने या सामन्यात २४३ धावांनी विजय मिळवला.

 virat kohli mohammed hafeez
World Cup Semi Final: टीम इंडियाचं सेमीफायनलचं ठीकाण बदलणार! समोर आलं मोठं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com