australian cricket team google
Sports

T-20 World Cup: पॅट कमिन्सचं लगेज चोरीला, स्टार्क अन् मॅक्सवेलची प्लाईट लेट; सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात गोंधळ

Australia Cricket Team: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्टइंडिजमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना ओमानविरुद्ध रंगणार आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ बारबाडोसमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना ६ जून रोजी ओमानविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ आधीच बारबाडोसमध्ये दाखल झाला होता. तर आयपीएल २०२४ स्पर्धा खेळून आलेले खेळाडू देखील संघासोबत जोडले गेले आहेत. दरम्यान वेस्टइंडिजमध्ये दाखल होताच ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातून मोठी बातमी समोर येत आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ ओमानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने आपल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स हा आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्रिकेटडॉटकॉमएयूने दिलेल्या वृत्तानुसार, पॅट कमिन्सने सिडनी ते वेस्टइंडिज असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्याच्या पत्तीने सांगितंल की, प्रवासात असताना त्याचं सामान हरवलं होतं. मात्र नंतर त्याला हरवलेल्या वस्तू मिळाल्या.

तसेच संघातील इतर फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांची फ्लाईट डिले झाली होती. तर मार्कस स्टोइनिसची किट बॅग वेळेवर उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे त्याला सराव सामना खेळता आला नव्हता. हे केवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत झालं असं नाही. तर श्रीलंकेचा कर्णधार वानिदूं हसरंगा, साऊथ आफ्रिका आणि आयर्लंड संघातील खेळाडूंनी देखील लगेजबाबत तक्रार केली होती.

पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन अमेरिकेत केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी अमेरिकेत नव्याने स्टेडियम उभारण्यात आलं आहे. या स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत तक्रार करण्या आली आहे. यासह भारतीय खेळाडूंच्या किट बॅग या स्टेडियमच्या बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. याबाबत बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रारही केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT