Team India चा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या चर्चेत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याचे खापर गंभीरवर फोडले जात आहे. मागच्या वर्षापासून सुरु झालेल्या गंभीरच्या कारकिर्दीत भारताने कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केली आहे. टीम इंडियाने ११ पैकी फक्त ३ कसोटी सामने जिंकेल आहेत. न्यूझीलंड विरुद्ध व्हाईटवॉश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३-१ असा पराभव भारताला पत्करावा लागला आहे. या एकूण परिस्थितीवर भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.
'जर भारतीय संघ अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही, तर गौतभ गंभीरच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. गंभीरला निवड समितीने त्याने मागितलेल्या सर्व गोष्टी दिल्या. त्यामुळे आता गौतम गंभीरवर निकाल देण्याचा दबाब आहे', असे आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
'गौतम गंभीरवर दबाव वाढत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये गौतम गंभीरच्या कारकिर्दीत भारताला अनेक सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. वनडे क्रिकेटमध्ये संघाने चांगली कामगिरी केली आहे. पण कसोटी क्रिकेटबद्दल गंभीरवर प्रश्न उपस्थित होत आहे. जर भारत विरुद्ध इंग्लंड ही मालिका चांगली झाली नाही, तर देव करो, मालिकेत भारतीय संघ चांगली खेळी करो. भारताने मालिका जिंकावी असे मला वाटत आहे. पण जर मालिकेत खराब खेळ झाला, तर गंभीरवर आणि त्याच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील', असे आकाश चोप्रा म्हणाला.
संघ व्यवस्थापन जे काही मागत आहे, ते दिले जात आहे. तुम्हाला ज्या प्रकारचा खेळाडू हवा आहे, तुम्हाला किती खेळाडू हवे आहेत; असे खेळाडू दिले जात आहेत. तुमच्या मताप्रमाणे, नियम लागू केले जात आहेत. जर तुम्ही मागाल ती गोष्ट मिळत आहेत, तर तुमच्याकडून निकालाची अपेक्षा देखील केली जात आहे आणि याच गोष्टीचा दबाव गंभीरवर असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.