भारताने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ रन्सने पराभव करून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने २० ओव्हर्समध्ये २५५ रन्स केले. त्यानंतर न्यूझीलंडची टीम १५९ रन्समध्ये गारद झाली. अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने चार विकेट्स घेतल्या आणि त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला.
भारताच्या विजयात सर्व खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मात्र तरीही खेळाडूंच्या मागचा कोच गौतम गंभीरची रणनीती भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत होती. टीमच्या मिटींग असो किंवा थेट सामन्यांदरम्यान कोच गंभीर खेळाडूंइतकाच एक्टिव्ह दिसून आला.
ज्यावेळी कठीण परिस्थिती उद्भवली तेव्हा गंभीर सूर्याला प्रोत्साहन देत होता आणि सामन्याचं चित्र पलटवण्यासाठी सामन्यांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेत होता. आज भारताला टी-२० वर्ल्डकप विजेता बनण्यास मदत करणासाठी गंभीरने कोणत्या रणनीतींचा वापर केला ते पाहूयात.
गंभीरने नेहमीच संजू सॅमसनला पाठिंबा दिलाय. ज्यावेळी गंभीर कोच बनला तेव्हा त्याने त्याला संजूला टीममद्ये घेत संधी दिली. टर्निंग पॉईंटची वाट पाहणाऱ्या संजूने गंभीरच्या सततच्या पाठिंब्याची परतफेड केली. वर्ल्डकपमधील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये सलग तीन अर्धशतकं झळकावून संजू भारताचा सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून ओळखला गेला.
गंभीरला अभिषेक शर्माच्या क्षमतेची जाणीव होती. त्यामुळे त्याने सतत अपयशी ठरल्यानंतरही अभिषेकला संधी दिली. शेवटी तो क्षण आला जेव्हा अभिषेकने अंतिम सामन्यात २१ चेंडूत ५२ रन्सची खेळी केली. अभिषेक टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा भारतीय ठरलाय.
फायनलच्या सामन्यात तिलक वर्माला फिनिशर म्हणून रोल देण्यात आला. वर्ल्डकपच्या काही सामन्यांमध्ये तिलक वर्मा फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून आलं. यावेळी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याऐवजी गंभीरने त्याला फिनिशरची भूमिका सोपवली. कोच आणि कर्णधाराच्या पाठिंब्याने तिलकने भारताचा नवीन फिनिशर म्हणून जबाबदारी स्विकारली.
डगआउटमध्ये असो किंवा टीम मीटिंगमध्ये गंभीर सातत्याने कॅप्टन सूर्याला पाठिंबा दिला. टी-२० वर्ल्डकपपूर्वी सूर्याच्या टीममधील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केलं जात होतं. परंतु गंभीरने सूर्यावर कधीही भाष्य केलं नाही. नेहमीच त्याला ट्रम्प कार्ड मानलं. गंभीरने सूर्याच्या कर्णधारपदाबद्दल म्हटलं होतं की, सूर्याच्या असल्याने त्याचं काम सोपं झालंय. गंभीर आणि सूर्या यांच्यातील समन्वयामुळे भारताने वर्ल्डकप जिंकला.
गंभीर डगआउटमध्ये बसून जागेवरून सूत्र फिरवायचा आणि याची प्रचिती सेमीफायनल सामन्यात दिसून आली. जेव्हा सामन्याच्या शेवटच्या क्षणी डगआउटमध्ये बसलेल्या गंभीरने हार्दिक पंड्याला १९ वी ओव्हर टाकण्यास सांगितली. त्यावेळी हार्दिकने कोच आणि कर्णधाराचा विश्वास जिंकला. त्या ओव्हरमध्ये फक्त ९ रन्स देऊन टीमला विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.