Shruti Vilas Kadam
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने काहींना ताजेतवाने वाटते, तर काहींना अॅसिडिटी, जळजळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.
कॉफीमुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे ज्यांना अॅसिडिटी, गॅस किंवा पोटाचे विकार आहेत, त्यांनी रिकाम्या पोटी कॉफी टाळावी.
सकाळी शरीरात कॉर्टिसोलचे प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असते. अशा वेळी जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास काही लोकांमध्ये तणाव किंवा अस्वस्थता वाढू शकते.
फळे, ड्रायफ्रूट्स किंवा हलका नाश्ता केल्यानंतर कॉफी घेतल्यास पोटावर ताण कमी येतो आणि अॅसिडिटीचा धोका कमी होतो.
दिवसभरात कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. अतिप्रमाणात कॉफी घेतल्यास झोपेवर, हृदयाचे ठोके आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
कॉफी प्यायल्यानंतर पोटदुखी, मळमळ, हृदयाचे ठोके वाढणे किंवा बेचैनी जाणवत असेल, तर ही सवय बदलण्याचा विचार करा.
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे योग्य की अयोग्य हे प्रत्येकाच्या आरोग्य, पचनशक्ती आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. गरज असल्यास आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.