Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Chhaya Kadam On Bigg Boss: मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी हिंदी बिग बॉसची ऑफर आल्याचा खुलासा केला आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करायचे नसल्याने त्यांनी ही ऑफर नाकारल्याचे सांगितले.
Chhaya Kadam On Bigg Boss
Chhaya Kadam On Bigg BossSaam TV
Published On

Chhaya Kadam On Bigg Boss: मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री छाया कदम या त्यांच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात. छोट्या भूमिकेतूनही प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या छाया कदम यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूतम भयम्' या चित्रपटातही त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटातील त्यांचा लूक इतका वेगळा आहे की, अनेकांना त्यांना ओळखणेही कठीण गेले.

याच चित्रपटाच्या निमित्ताने छाया कदम यांनी 'गलाटा इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीबरोबरच वैयक्तिक आयुष्याविषयीही अनेक गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे, हिंदी 'बिग बॉस'कडून आपल्याला ऑफर आली होती, असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

Chhaya Kadam On Bigg Boss
Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

मुलाखतीदरम्यान त्यांना, "तुम्हाला कधी कोणत्या रिअॅलिटी शोची ऑफर आली होती का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना छाया कदम म्हणाल्या, "मी पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेले होते, त्यावेळी मला हिंदी 'बिग बॉस'कडून ऑफर आली होती. त्यांनी मला शोमध्ये सहभागी करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र माझ्याकडूनच काही झालं नाही."

Chhaya Kadam On Bigg Boss
Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलगडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

त्या पुढे म्हणाल्या, "माझ्या काही वैयक्तिक गोष्टी आहेत, त्या मी स्वतःजवळच ठेवू इच्छिते. त्या संपूर्ण जगासमोर मांडण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे मी त्यावेळी 'बिग बॉस'मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला."

छाया कदम यांनी यावेळी एक मजेशीर किस्साही सांगितला. त्या म्हणाल्या, "मी त्यांना सांगितलं होतं की, तुमचा टीआरपी खूप चांगला आहे. पण मला सध्या हा शो करायचा नाही. मात्र माझी मावशी 'बिग बॉस'ची मोठी चाहती आहे. ती आजही रिपीट टेलिकास्ट पाहते आणि मला प्रत्येक भागातील घडामोडी सांगत असते."

दरम्यान, छाया कदम यांनी 'फँड्री', 'सैराट', 'न्यूड', 'गंगूबाई काठियावाडी', 'लापता लेडीज', 'मडगाव एक्सप्रेस' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. 'न्यूड' चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच त्या नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट झळकरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com