Gautam Gambhir Harshit Rana x
Sports

मला टार्गेट करा, पण त्याला सोडा; २३ वर्षीय हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर भडकला गौतम गंभीर

Gautam Gambhir : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने हर्षित राणाला ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला.

Yash Shirke

  • हर्षित राणाला मागील काही काळापासून सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

  • गौतम गंभीरने २३ वर्षीय हर्षित राणावर झालेल्या ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला.

  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनंतर गौतम गंभीरने ट्रोलिर्सवर निशाणा साधला.

Gautam Gambhir Harshit Rana : वेगवान गोलंदाज हर्षित राणावर मागील काही दिवसांपासून टीका सुरु आहे. त्याच्या निवडीवरुन हर्षित राणा आणि गौतम गंभीर यांच्यावर टीका होत आहे. टीका करणाऱ्यांवर गौतम गंभीरने निशाणा साधला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकली. या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने हर्षित राणाचे समर्थन केले. हर्षितच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर गंभीरने संताप व्यक्त केला.

अरुण जेटली स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. 'हे लज्जास्पद आहे. यूट्यूब चॅनलसाठी २३ वर्षीय मुलाला लक्ष्य केले जात आहे. हा अन्याय आहे. त्याचे वडील क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष, माजी क्रिकेटपटू किंवा एनआरआय नाहीयेत. तो त्याच्या क्षमेतवर इथवर आला आहे. तो त्याच्या क्षमतेनुसार क्रिकेट खेळत आहे आणि त्याच्या क्षमतेनुसार खेळत राहील. एखाद्यावर वैयक्तिकरित्या लक्ष्य करणे योग्य नाही', असे गौतम गंभीर म्हणाला.

गौतम गंभीरने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले, 'खेळाडूच्या कामगिरीवर टीका केली जाऊ शकते. निवडकर्ते आणि प्रशिक्षक त्यासाठीच असतात. पण जर तुम्ही २३ वर्षांच्या तरुण खेळाडूवर वैयक्तिक हल्ला केला आणि त्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल करत असाल, तर त्याच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. भविष्यात कधीतरी तुमच्या मुलालाही कोणी अशाप्रकारे लक्ष्य करु शकतं. तो अजून २० वर्षांचा आहे, ३०-३३ वर्षांचा अनुभव त्याच्याकडे नाहीये.'

हर्षित राणा हा आशिया कप २०२५ जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. १९ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्येही त्याची निवड झाली आहे. आतापर्यंत हर्षितने भारतासाठी २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. भारतीय संघात त्याच्या निवडीवरुन गौतम गंभीरवर टोला मारला जात आहे. या ट्रोलिंगही गंभीरने उत्तर दिले.

'तुम्ही माझ्यावर टीका करु शकता. मी ते हाताळू शकतो. पण २३ वर्षीय खेळाडू असे करु शकत नाही. तुमचे यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी आपण काय बोलतो याकडे सावधगिरीने पाहिले पाहिजे. भारतीय क्रिकेट हे माझे नाही. आपणा सर्वांचे आहे. तुम्ही टीका करू शकता, पण कामगिरीवरून... तुम्ही मला लक्ष्य करता, ते ठीक आहे. पण एका लहान मुलाला लक्ष्य करु नका. हे फक्त हर्षितबद्दल नाही. भविष्यातही या तरुण मुलांना लक्ष्य करु नका', असे म्हणत गंभीरने ट्रोलर्स उत्तर दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

डोंबिवलीत मोठा राडा! दोन महिला गटांमध्ये वाद, फेरीवाल्या महिलेने अंगावर पेट्रोल ओतले अन्...

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

SCROLL FOR NEXT