Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

Virat Kohli RCB IPL 2025 : विराट कोहलीने आरसीबीसोबत व्यावसायिक करार करण्यास नकार दिला आहे. यामुळे विराट बंगळुरूच्या संघातून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
virat kohli ipl rcb
virat kohli ipl rcbx
Published On
Summary
  • विराट कोहलीने आरसीबीसोबत व्यावसायिक करार करण्यास दिला नकार

  • तो आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा आरसीबीकडून खेळणार नसल्याची चर्चा

  • पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये विराट दुसऱ्या संघाकडून खेळणार का?

Virat Kohli हा आरसीबीकडून आयपीएल २०२६ मध्ये खेळणार नाही, तो दुसऱ्याच संघाकडून खेळताना दिसेल किंवा तो थेट निवृत्तीचीच घोषणा करेल अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे विराटच्या आणि आरसीबीच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

२०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलची ट्रॉफी जिंकली. यानंतर आता विराट आरसीबीमधून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याने आरसीबीसोबत व्यावसायिक करार करण्यास नकार दिल्याचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोडणार असल्याची चर्चा होत आहे.

virat kohli ipl rcb
IND Vs WI Test : वेस्ट इंडिजच्या शेपटाने भारताला झुंजवले! कॅम्बेल, होप यांच्या शतकानंतर १० व्या विकेटच्या जोडीने रडवले

विराटने व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. पण याचा अर्थ तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधून बाहेर पडणार आहे असा होत नाही. सध्या तरी विराटचा आरसीबी सोडण्याचा विचार नाहीये. तो आयपीएलमधून निवृत्ती घेणार नाहीये. विराट पुढच्या वर्षी आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा बंगळुरूच्या संघाकडून खेळताना दिसेल.

virat kohli ipl rcb
Maharashtra Rainfall : मान्सूनचा राज्यातून निरोप, पण वादळी पावसाचा इशारा; पुढचे ४ दिवस धो-धो कोसळणार

व्यावसायिक करार आणि खेळाडू करार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विराट कोहली आरसीबीमधून बाहेर पडला असता, तर खेळाडू म्हणून त्याच्यासोबत झालेला करार रद्द झाला असता. त्याने व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ त्याने कोणत्याही ब्रँडशी संबंध जोडण्यास नकार दिला आहे. फ्रँचायझी विविध कंपन्यांकडून स्पॉन्सरशिप घेत असतात, तेव्हा खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान ब्रँडसाठी व्हिडीओ किंवा जाहिराती तराव्या लागतात. विराट सध्या कोणत्याही ब्रँडशी जोडला जाऊ इच्छित नसल्याने त्याने व्यावसायिक करार करण्यास नकार दिला.

virat kohli ipl rcb
India आघाडीसह काँग्रेसला मोठं खिंडार! ३ आमदार, १ खासदारासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com