भारतीय युवा क्रिकेटपटू हर्षित राणाची ऑस्ट्रेलिया २०२५ दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. यानंतर हर्षितला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. चांगली कामगिरी नसूनही भारतीय संघात सातत्याने संधी कशी दिली जात आहे असा प्रश्न माजी क्रिकेटपटूंपासून ते क्रिकेटप्रेमींनी उपस्थित केला.
माजी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विने हर्षितच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर माजी निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांतने हर्षित राणा हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा आवडता खेळाडू असल्यामुळे त्याला संघात संघी दिली जात आहे अशी टीका केली. तर दुसरीकडे, हर्षित राणाला ट्रोल केल्याबद्दल गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे आणि हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. कोण आहे हर्षित राणा, कसा आहे दिल्लीच्या वेगवान गोलंदाजाचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास, जाणून घेऊयात.
कोण आहे हर्षित राणा?
वेगवान गोलंदाज हर्षित प्रदीप राणाचा जन्म २२ डिसेंबर २००१ रोजी नवी दिल्ली येथे झाला. २३ वर्षाचा राईट आर्म वेगवान गोलंदाजाने २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. हर्षितने आंतरराष्ट्रीय कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही स्वरुपात पदार्पण केले आहे. त्याने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तर पुणे येथे ३१ जानेवारी २०२५ रोजी शिवम दुबेच्या जागी सबस्टिट्यूट म्हणून इंग्लंडविरुदध पहिला टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली. तसेच फेब्रुवारी २०२५ मध्ये नागपूर येथे इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यासाठी निवड करण्यात आली.
डोमेस्टिक सर्किटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर हर्षितला आयपीएलमध्येही यश मिळाले. हर्षितने आयपीएल २०२२मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण केले. ३४ सामन्यांमध्ये त्याने ४० विकेट्स घेतले तर ५९ धावा केल्या. २०२४ मध्ये १३ सामन्यात १९ विकेट्स घेत कोलकाता संघाल आयपीएल जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे २०२५ च्या आयपीएलसाटी कोलकता नाईट रायडर्सने हर्षितला संघात रिटेन केले.
गौतम गंभीरचे ट्रोलर्सना उत्तर
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे. गौतम म्हणाला की, "तुम्ही एका २३ वर्षांच्या मुलाला वैयक्तिकरित्या टारगेट करत आहात हे थोडे लाजिरवाणे आहे. हर्षितचे वडील माजी अध्यक्ष नाहीत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला टारगेट करत आहात हे योग्य नाही. सोशल मीडियावर ट्रोल करणे योग्य नाही आणि त्याच्या मानसिकतेचा विचार करा.गंभीर पुढे म्हणाला, "तुमचे यूट्यूब चॅनेल चालवण्यासाठी काहीही बोलू नका. तुम्हाला हवे असेल तर मला टारगेट करा, मी ते हाताळू शकतो पण त्या मुलाला एकटे सोडा आणि हे सर्व तरुण स्टार्ससाठी सारखेच आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.