gautam gambhir and kkr coach arguement with umpire over sunil narine kkr vs rcb ipl 2024 amd2000 twitter
क्रीडा

Virat Kohli Wicket: विराटच्या विकेटवरुन गंभीर थेट अंपायरशी भिडला? KKR - RCB सामन्यातील तो Video व्हायरल

Gautam Gambhir- Virat Kohli: या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यातील गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने शेवटच्या चेंडूवर रनआऊट करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर १ धावेने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान विराटची विकेट चर्चेचा विषय ठरली. दरम्यान हा सामना झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतम गंभीर चौथ्या अंपायरसोबत चर्चा करताना दिसून येत आहे. ही घटना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फलंदाजी सुरू असताना १८ -१९ व्या षटकादरम्यान घडली. या डावातील १९ वे षटक सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीर अंपायरसोबत चर्चा करताना दिसून आला. सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की, विराटला बाद घोषित करण्यावरून गंभीर अंपायरसोबत चर्चा करतोय. मात्र असं काहीच नसून, प्रकरण वेगळंच आहे.

तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फलंदाजी सुरू असताना १८ व्या षटकानंतर कोलकाता नाईट रायडर्सला सुनील नरेनला बाहेर बोलवायचं होतं. त्याच्याऐवजी अनुकूल रॉयला मैदानात उतरवण्याचा कोलकाताचा प्लान होता. मात्र अंपायरने त्याला मैदानाबाहेर जाऊ दिलं नाही.

कोलकाता नाईट रायडर्सने केलेली ही मागणी अंपायरने फेटाळून लावली. त्यामुळे सुनील नरेनला पुन्हा एकदा मैदानात उतरावं लागलं. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कोच चंद्रकांत पंडित आणि गौतम गंभीर हे भडकल्याचं दिसून आलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २२२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २२१ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयापासून केवळ १ धाव दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT