IPL 2024 PBKS vs GT: पंजाब किंग्सकडून गुजरातसमोर १४३ धावांचे माफक आव्हान

PBKS vs GT : सुपर संडेमधील पहिला रोमांचक सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात पाहायला मिळाला. दुसरा सामना पंजाब आणि गुजरातचे संघामध्ये होत आहे.
IPL 2024 PBKS vs GT: पंजाब किंग्सकडून गुजरातसमोर १४३ धावांचे माफक आव्हान
Published On

Punjab Kings vs Gujarat Titans:

सुपर संडेमधील पहिला रोमांचक सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात पाहायला मिळाला. दुसरा सामना पंजाब आणि गुजरातचे संघामध्ये होत आहे. मोहाली येथील मुल्लानपूर येथे होत असलेल्या सामन्यात पंजाबचा संघ १४२ धावांवर ऑल ऑउट झाला. मागील सामन्यात दारुण पराभव स्वीकारणाऱ्या गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी १४३ धावांची गरज आहे.

या सामन्यात पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली होती. प्रभसिमरन सिंगने २१ चेंडूत ३५ आणि सॅम कुरनने २० धावा केल्या. संघाने ५२ धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर फलंदाजांची घसरगुंडी झाली, जी शेवटपर्यंत थांबली नाही. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे संपूर्ण संघ दडपणाखाली आला. पण शेवटी ९व्या क्रमांकावर आलेल्या हरप्रीत ब्रारने १२ चेंडूत २९ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या करुन दिली.

या फलंदाजांच्या जोरावर पंजाब किंग्सने १४२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. गुजरात संघाकडून फिरकीपटू साई किशोरने ४ बळी घेतले. तर नूर अहमद आणि मोहित शर्माने २-२ विकेट घेतल्या. दरम्यान दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने आलेत. याआधी दोन्ही संघ ४ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये भिडले होते. पंजाबच्या संघाने ३ विकेट राखत हा सामना जिंकला होता. आता त्या सामन्याचा बदला घेण्यासाठी गुजरात मैदानात उतरला आहे. दुखापतग्रस्त शिखर धवन या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी सॅम कुरन कर्णधारपद सांभाळत आहे.

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने झालेत. या कालावधीत गुजरात टायटन्सने दोन सामने जिंकले असून पंजाब किंग्सनेही दोन सामने जिंकलेत. गेल्या वेळी मोहालीच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात गुजरात टायटन्सने ६ गडी राखून विजय मिळवला होता. दरम्यान पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघ आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.

गुजरात संघाचे प्लेइंग ११

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, नूर अहमद, संदीप वारियर, मोहित शर्मा.

पंजाब किंग्सचे प्लेइंग ११

सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिले रोसो, लियाम लिव्हिंगस्टन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com