कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना असेल तर वाद होतोच. यापूर्वी अनेकदा हे चित्र पाहायला मिळाले आहे. मुख्य बाब म्हणजे विराट कोहलीचा त्यात समावेश असतोच. रविवारी (२१ एप्रिल) झालेल्या सामन्यातही विराट बाद झाल्यानंतर मैदानातील वातावरण तापलं. विराट खरंच बाद होता का? जाणून घ्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी मैदानावर आली. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून हर्षित राणा तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने फुल टॉस टाकला. हा चेंडूत विराटने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटला लागून हवेत गेला आणि हर्षित राणाने झेल टिपला. हर्षित राणाने झेल घेताच विराट कोहलीने DRS ची मागणी केली.
पहिलाच चेंडू फुल टॉस येईल असा विराटने विचारच केला नसेल. हर्षित राणाने झेल टिपल्यानंतर क्षणही न दवडता DRS ची मागणी केली. त्याला वाटलं होतं की, हा नो चेंडू आहे. मात्र DRS मध्ये पाहिलं असता हा चेंडू नो बॉल रेषेच्या खाली असल्याचं दिसून आलं. हे पाहताच विराट कोहली अंपायरशी वाद घालताना दिसून आला.
विराट कोहली बाद होता का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, हो. पहिली गोष्ट तर विराट कोहली हा शॉट खेळण्यासाठी पुढे आला होता. असं असलं तरीदेखील चेंडू नो बॉलसाठी निर्धारित उंचीपेक्षा खाली होता. विराट कोहली या निर्णयावरून नाराज असल्याचा दिसून आला. तो मैदानाबाहेर जात असतानाही डोके हलवत डग आऊटकडे गेला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २२१ धावा करता आल्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १ धावेने गमावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.