virat-kohli-with-rohit-sharma saam tv news
Sports

Virat Kohli- Rohit Sharma: टी-२० वर्ल्डकपसाठी विराट-रोहितला संघात स्थान मिळणार का? दिग्गज खेळाडूने स्पष्टच सांगितलं

Brian Lara Statement: येत्या जून महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत विराट आणि रोहितला संधी मिळणार का याबाबत ब्रायन लारा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Brian Lara On Virat Kohli And Rohit Sharma:

नुकताच वर्ल्डकप २०२३ स्पर्धा संपली असून, भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सुरुवातीचे १० सामने जिंकले मात्र फायनलचा सामना गमावल्याने तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची संधी हुकली.

आता भारतीय संघाचं संपुर्ण लक्ष २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेवर असणार आहे. दरम्यान या स्पर्धेत रोहित आणि विराट खेळणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहेत. मात्र गेल्या काही टी-२० मालिका पाहिल्या, तर संघात युवा खेळाडूंना स्थान दिलं जात आहे. यासह वरिष्ठ खेळाडूंना दुर्लक्ष केलं जात आहे.

ज्यात विराट आणि रोहित सारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र तो आता दुखापतीमुळे बाहेर असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्याबाबत बोलताना वेस्टइंडिजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा म्हणाले की,'मला असं वाटतं की, भारत जो संघ निवडेल तो मजबूतच असेल. मात्र तुम्ही अनुभवाची जागा घेऊ शकत नाही. विराट आणि रोहित हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना वेस्टइंडिजमधील परिस्थितीचा चांगलाच अंदाज आहे. त्यांना तिथे खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे.' (Latest sports updates)

तसेच ते पुढे म्हणाले की, 'मी हे म्हणत नाही की, त्यांनी आपल्या भविष्याबाबत निर्णय घ्यावा.मात्र मला असं वाटतं की, ते ज्या दर्जाचे खेळाडू आहेत, ते पाहता त्यांना भारतीय क्रिकेटसाठी काय आणि किती करायचं आहे हे जाणून घेणं सन्मान असेल.'

विराट आणि रोहितला संधी का दिली जात नाही?

विराट आणि रोहितला वाढत्या वयामुळे संधी दिली जात नाहीये. विराट आणि रोहितचं वय ३५ च्या पुढे आहे. त्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. मुख्य बाब म्हणजे नुकताच संपन्न झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हे दोघेही टॉप २ मध्ये होते.

विराट कोहलीने ७६५ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माने ५९७ धावा केल्या होत्या.या दोन्ही फलंदाजांनी आयपीएल स्पर्धेतही दमदार खेळ केला आहे. त्यामुळे या दोघांना संघाबाहेर ठेवण्याचं रिस्क टीम मॅनेजमेंट घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT