team india twitter
Sports

IND vs NZ Test: 'आज तुम्हाला द्रविडची आठवण..' भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू भडकला

Basit Ali On Team India: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने भारतीय संघाच्या पराभवाबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Basit Ali On IND vs NZ Series: भारतीय संघाला पहिल्यांदाच मायदेशात खेळताना कसोटी मालिकेत ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी भारताने मायदेशात कसोटी मालिका खेळताना कधीच ३-० ने मालिका गमावली नव्हती.

मात्र न्यूझीलंडने हा कारनामा करून दाखवला आहे. बंगळुरु, पुणे आणि मुंबईत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंवर जोरदार टिका केली जात आहे. दरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडूने गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीच्या मते गंभीरची प्लानिंग ही आयपीएल सारखीच आहे. गौतम गंभीरने याच वर्षी जुलै महिन्यात मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्विकारला होता. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मेंटॉरची भूमिका बजावली होती. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवण्यात आली होती.

काय म्हणाला बासित

बासितने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, ' आज भारतीयांना नक्कीच राहुल द्रविडची आठवण आली असेल. ते चार दिवसांचा प्लान बनवायचे आणि हे लोक २ किंवा अडीच दिवसांचा प्लान करत आहेत.' या मालिकेतील पराभव हा भारतीय खेळाडूंच्या चांगलात जिव्हारी लागला आहे. कारण, या पराभवानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. गेली काही महिने अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानी सरकला आहे.

हे कसोटी क्रिकेटला संपवून टाकेल

गंभीरच्या प्लानिंगबद्दल बोलताना बासित म्हणाला की,' तुम्ही अनेक प्रशिक्षकांच्या मुलाखती ऐकल्या असतील, त्यांनी अनेकदा म्हंटलय की, कसोटी सामने आता ड्रॉ होत नाहीत. हे बरोबर आहे. मात्र याचा अर्थ असा मुळीच होत नाही, की तुम्ही आयपीएल जिंकून आलेत, तर कसोटी क्रिकेटही त्याच फॉरमॅटमध्ये खेळावं. टी-२० वेगळं आहे. हे कसोटी क्रिकेटला संपवून टाकेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT