pakistan cricket team google
क्रीडा

Pakistan Cricket Team: ICC मुळे पाकिस्तानचा संघ सुपर 8 मध्ये पोहचू शकला नाही,माजी कर्णधाराचा मोठा आरोप

Ankush Dhavre

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी अ गटात समावेश करण्यात आला होता. भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर पाकिस्तानचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

पहिल्या सामन्यात नवख्या अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. या सुमार कामगिरीनंतर बाबर आझमसह संपूर्ण संघावर जोरदार टीका केली गेली. दरम्यान संघाचा माजी कर्णधार राशिद लतीफने पाकिस्तान संघाला समर्थन करत आयसीसीला दोषी ठरवलं आहे.

क्रिकबझसोबत बोलताना राशिद लतीफ म्हणाले की, ' तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तान संघाला दोषी ठरवू शकत नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र खेळपट्टी आणि परिस्थितीने त्यांची मेहनत वाया घालवली आहे. त्यांना भारत आणि पाकिस्तानविरुद्ध झालेले दोन्ही सामने जिंकायचे होते. मात्र परिस्थिती त्यांच्या हातात नव्हती. इथे धावा करणं खूप कठीण होतं. तुन्ही पाहा ना विराट कोहलीसारखा फलंदाजही इथे धावा करु शकत नाहीये.'

राशिद लतीफच्या मते,आयसीसीमुळे पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८ मध्ये पोहचू शकलेला नाही. ते म्हणाले की, ' केवळ अमेरिकेतच नव्हे तर परिस्थिती ही वेस्टइंडिजमध्येही खराबच आहे. वैयक्तिक अर्धशतकांची संख्या खूप कमी आहे. कुठल्याच संघाने अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना अर्धशतक झळकावलेलं नाही. जर संघातील फलंदाजाने अर्धशतक झळकावलं, तर तो संघ जिंकायचा चान्स अधिक असतो. रिषभ पंतने ४२ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केलं. ही परिस्थिती वर्ल्डकप खेळण्यासाठी अनुकूल नाही.'

या संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तान संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT