vinod kambli twitter
Sports

Vinod Kambli Dance: विनोद कांबळी ऑन फायर! हॉस्पिटलमध्ये केला भन्नाट डान्स; VIDEO पाहाच

Vinod Kambli Dance Video: भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यादरम्यान त्यांनी भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दादरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते सचिन तेंडुलकरसोबत एकाच मंचावर दिसून आले होते. त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

आता सध्या तो ठाण्यातील एका रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात ते रुग्णालयाच्या स्टाफमधील एका सदस्यासोबत डान्स करताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त चक दे इंडिया चित्रपटातील थीम साँगवर डान्स करताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. मात्र आता ते स्वत:च्या पायावर उभे राहुन डान्स करताना दिसून येत आहेत.

डान्स करताना ते जोरात चक दे इंडिया असंही म्हणाले. त्यांची ही एनर्जी पाहून, त्यांच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली असल्याचं दिसून येत आहे. ही सर्वच क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

दादरमधील कार्यक्रमात आले होते एकत्र

दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर, कोच रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ते सचिनला ओळखूही शकले नव्हते. यासह बोलताना आणि चालतानाही त्रास होत होता. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे.

विनोद कांबळींच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना भारतीय संघाकडून १७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांना ५४ च्या सरासरीने १०८४ धावा करता आल्या. तर १०४ वनडे सामन्यांमध्ये त्यांना २४७७ धावा करता आल्या. यासह त्यांना १९९६ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT