virat kohli gautam gambhir saam tv news
Sports

Virat Kohli: कोहली - गंभीर वादावर माजी भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा! धोनीबद्दचं केलं कौतुक

Virat Kohli -Gautam Gambhir Controversy: आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघेही आमने सामने आले होते. या सामन्यात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Ankush Dhavre

Praveen Kumar On Virat Kohli- Gautam Gambhir Controversy:

आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक गाजलेलं प्रकरण म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मैदानावर झालेला राडा. आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघेही आमने सामने आले होते.

विराट आणि नवीनच्या वादात गंभीरने उडी घेतली त्यानंतर ते भांडण या दोघांकडे वळलं. विराट आणि गंभीर आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी अनेकदा या दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या वादावर माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमारने भाष्य केलं आहे.

मोठ्या भावाने छोट्या भावावर रागावलं तर यात गैर काय. तो मोठा आहे तो त्याच्यावर रागावू शकतो. असं प्रवीण कुमारचं म्हणणं आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' विराट कोहली खूप चांगला व्यक्ती आहे. त्याला धावा कशा करायच्या हे माहितेय. त्यामुळेच तो या शिखरावर पोहोचला आहे. आपल्या फिटनेसवर कशी मेहनत घ्यायची यासह प्रॉपर डायट कसा घ्यायचा. हे त्याला चांगलच माहीत आहे. गौतम गंभीर हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे.' (Latest sports updates)

प्रवीण कुमारने विराट - गंभीर वादावर भाष्य करण्यासह एमएस धोनीबाबतही भाष्य केलं आहे. त्याने धोनीबाबत बोलताना म्हटलं की, ' एमएस धोनी चतुर कर्णधार आहे. त्याचं डोकं कंप्युटरपेक्षाही वेगाने चालतं. हेच कारण आहे की, क्रिकेटच्या मैदानावर एमएस धोनी कर्णधार म्हणून सुपरहिट ठरला आहे.' एमएस धोनी हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २००७, आयसीसी वनडे वर्ल्डकप २०११ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT