Virat Kohli: विराटमध्ये दिसली धोनीची झलक! स्टम्पच्या मागून सिराजला दिला 'गुरुमंत्र';पुढच्याच बॉलवर फलंदाज आऊट ; Video व्हायरल

Virat Kohli Viral Video: सिराजची चर्चा सुरु असताना विराट कोहली वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे, सिराजला दिलेला गुरुमंत्र.
virat kohli
virat kohlitwitter
Published On

Virat Kohli Guide Mohammed Siraj:

केपटाऊनच्या मैदानावर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) २०२३ आशिया कप स्पर्धेतील फायनलची आठवण करुन दिली आहे. मैदान वेगळं, फॉरमॅट वेगळा, विरोधी संघ वेगळा मात्र गोलंदाजीतील धार तीच होती.

सिराजने घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर सळो की पळो करुन सोडलं. त्याने अवघ्या १५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. सिराजची चर्चा सुरु असताना विराट कोहली (Virat Kohli) वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे, सिराजला दिलेला गुरुमंत्र.

या सामन्यातील पहिल्या डावात सिराजने यान्सेनला बाद करत माघारी धाडलं. यान्सेनला बाद करण्यापूर्वी विराट कोहली सिराजला यष्टीमागणं इशारा करताना दिसून आला. त्याने इशारा करत यान्सेनला बाद करण्याची टीप्स दिली. सिराजनेही विराटने सांगितल्यानूसार बॉल टाकला आणि याच षटकात त्याने यान्सेनला बाद केलं. यापूर्वी धोनीही यष्टीमागणं गोलंदाजांना गाईड करायचा. त्यामुळे विराटमध्ये धोनीची झलक पाहायला मिळाली आहे.

virat kohli
IND vs SA, Day 1: केपटाऊन कसोटीतील पहिलाच दिवस ठरला रेकॉर्ड ब्रेकिंग! १५० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

तर झाले असे की, सिराजने १६ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्को यान्सेनला बाद करत माघारी धाडलं. तो केएल राहुलच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. गेल्या सामन्यात यान्सेन भारतीय गोलंदाजांना चांगलाच नडला होता.

या सामन्यात तो फलंदाजीला येताच विराटने गोलंदाजी करत असलेल्या सिराजला त्याला बाद करण्याची ट्रीक सांगितली. विराटने त्याला स्टम्पच्या जवळच्या लाईनवर गोलंदाजी करायला सांगितलं. सिराजनेही असच केलं. त्यामुळे चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षण करत असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. (Latest sports updates)

virat kohli
IND vs SA 2nd Test : पहिल्याच दिवशी पडल्या २३ विकेट; १३४ वर्षांपूर्वी घडला होता पहिला विक्रम

अवघ्या ५५ धावांवर आटोपला दक्षिण आफ्रिकेचा डाव..

केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या कसोटीत ४०८ धावांचा डोंगर उभारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी चांगलाच घाम काढला. पहिल्याच सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ तर बुमराहने २ आणि मुकेश कुमारने २ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com