Shreya Maskar
अनेक रिसर्चमधून असे दिसून आले आहे की, 20 ते 44 वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
हृदयविकाराची मुख्य कारण म्हणजे अस्वस्थ जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आहे. तसेच तंबाखू आणि दारूच्या सेवनाने देखील हार्ट अटॅक येतो. तुमचे हृदय हेल्दी आहे का? हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता.
हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलमुळे अडथळा (Blockage) निर्माण होऊन रक्ताची गुठळी (Clot) तयार झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे शरीराची विशेष काळजी घ्या.
डाव्या मनगटाची नाडी तपासा. १० सेकंदात ठोक्यांची संख्या मोजा आणि त्या आकड्याला ६ ने गुणा. सामान्य हृदयाचा वेग प्रति मिनिट ६० ते १०० ठोके अशी असतो. जर हा दर ११० पेक्षा जास्त असेल तर वेळीच सावध व्हा.
हातांची पकड किती मजबूत आहे, त्यावरून शरीरातील आजारांचा धोका समजतो. जर तुम्हाला हाताची पकड कमकुवत वाटत असेल. तर तुम्ही वैद्यकीय तपासणी करा.
10-12 पायऱ्या चढल्यावर तुम्हाला थकवा येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. साधारणपणे 1 मिनिटात सुमारे 40-50 पायऱ्या सहज चढल्या जातात.
ब्लड प्रेशर मॉनिटरच्या मदतीने नियमितपणे बीपी मोजा. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वेळेत टाळता येतो. ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त असेल तर डॉक्टरांकडे जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.