Orange Peel Soap : संत्र्याची सालं कचऱ्यात टाकताय? थांबा! चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा सुगंधित साबण, वाचा पद्धत

Shreya Maskar

संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, सायट्रिक ॲसिड, पोटॅशियम असते. जे जे त्वचेला चमकदार आणि तरूण ठेवते. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी होतात.य

Orange Peel | yandex

संत्र्याच्या सालीचा साबण

संत्र्याच्या सालीपासून साबण बनवण्यासाठी संत्र्याची साल, साबणाचा बेस आणि सिलिकॉन मोल्ड इत्यादी साहित्य लागते.

Orange peel soap | yandex

संत्री

संत्र्याच्या सालीपासून साबण बनवण्यासाठी सर्वप्रथम संत्र्याची साल सोलून घ्या. सालींमध्ये थोडे पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा.

Orange | yandex

साबणाचा बेस

एका बाऊलमध्ये तयार पेस्ट गाळून घ्या. त्यानंतर दुसरीकडे साबणाच्या बेसचे छोटे तुकडे करा आणि वितळवून घ्या. साबणाचा बेस वितळवण्यासाठी डबल बॉयलर पद्धतीचा वापर करा.

Soap base | yandex

संत्र्याच्या साल

साबणाचा बेस वितळल्यावर त्यात संत्र्याच्या सालीचे मिश्रण घाला आणि व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर मिश्रण सिलिकॉन मोल्डमध्ये ओतून 5-6 तास सेट करायला ठेवा.

Orange peel | yandex

वापर कसा करावा?

तुम्ही हा साबण हात-पाय स्वच्छ करताना, आंघोळ करताना वापरू शकता. साबणाचा वापर केल्यावर तो चांगला कोरडा करून साबणाच्या डब्यात ठेवून द्या. साबण जास्त काळ टिकतो.

Soap | yandex

फायदे

संत्र्याच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे पुरळ , मुरुमे कमी करण्यास मदत करतात. तसेच चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते.

Soap | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Orange | yandex

NEXT : Face Pack लावल्यावर त्वचा कोरडी होते? मग मऊ अन् तजेलदार त्वचेसाठी 'हे' पदार्थ फेस पॅकमध्ये मिक्स करायला विसरू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Pack | yandex
येथे क्लिक करा...